खूप काही करण्याची क्षमता असणारा माणूस देखील अनेकदा थांबलेला का दिसतो ?? | वैचारिक || खासमराठी

खूप काही करण्याची क्षमता असणारा माणूस देखील अनेकदा थांबलेला का दिसतो?? | वैचारिक || खासमराठी
खूप काही करण्याची क्षमता असणारा माणूस देखील अनेकदा थांबलेला का दिसतो?? | वैचारिक || खासमराठी

खूप काही करण्याची क्षमता असणारा माणूस देखील अनेकदा थांबलेला का बरं दिसतो ??


     कदाचित तो थांबलेला दिसत असला तरी तो थांबलेला नसतो.... लाखो मुली शेजारी लाईन देत उभ्या असताना ही कदाचित त्याचा जीव एकीवरच अडकलेला असतो .

     पटवण्याची प्रचंड प्रतिभा असताना ही तो प्रत्येकीकडे साफ दुर्लक्ष का करत असतो...?


      कारण त्याचा जीव त्या लाखो गोष्टी सोडून त्या फक्त एकीतच धडकत असतो !      कदाचित त्या 'एकी' मुळेच हा इतर सगळ्या संधींकडे साफ दुर्लक्ष करत असतो.... म्हणून आणि फक्त म्हणून तो आयुष्यात इतरांपेक्षा जरा जास्त अयशस्वी भासतो.......

       पण कुणाला बरं ठाऊक असतं? कोण मोजपट्टी घेऊन मोजलेलं असतं.... त्या एकीसाठी हे बेणं किती धडपडलेलं असतं..... जगण्याआधीच वेड्यासारखं कितीदा मेलं असतं..... आईचं बोलणं बापाच्या शिव्या रोज कितीदा खात असतं....

      कोणालाच सांगता येत नाही म्हणून न सांगता ही फक्त तिच्यावरच मरत असतं....

      कोणी मोजलंच कधी तर कधीतरी कुणाला कळलं असतं इतरांच्या लाखपटीने जास्ती यश याने आधीच मिळवलेलं असतं... पण जगाने मात्र या माशाला झाडावर चढत नाहीये म्हणून साफ मूर्ख ठरवलेलं असतं !!

       पोरींच्याच बाबतीत नाही रे भावांनो, Business , स्पर्धा परीक्षा आणि जगातील प्रत्येक क्षेत्रात असं कुणीतरी रोज मूर्ख बनत असतं.... अन लोकांना वाटतं याला सगळं करता येत असून पण हे बेणं काहीच का बरं करत नसतं!!


 बाकीच्यांना कळणार तरी कसं ? कारण त्याचं स्वप्न त्याच प्रेम फक्त त्याला एकट्यालाच खुणावत असतं !!

        स्वतःतील पूर्ण क्षमता, पूर्ण ताकद   आणि आपण काय काय करू शकतो या गोष्टींची जाणीव असणाऱ्या आणि तरी देखील इतरांच्या नजरेत अपयशी ठरवलेल्या प्रत्येकाला समर्पित !

जीव लावलाच आहात ना मग त्या एकीवरच शेवटपर्यंत प्रेम करा माझे शब्द तुम्हाला प्रेरणा देत राहोत इतकीच सदिच्छा !!

~ S.J.

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने