विराट कोहली |व्यक्तीविशेष  || खासमराठी विराट कोहली |Khasmarathi
विराट कोहली| व्यक्तीविशेष |Khasmarathi

विराट कोहली


          भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८:दिल्ली, भारत)
उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.

      अतिशय कमी कालावधीत खूप लोकप्रिय होण्यामागे विराट ची मेहनत खेळाडू वृत्ती, खेळाप्रति असलेली प्रचंड आवड आणि त्याच्या प्रत्येक मॅच मधील त्याच्या धावांचा चढता आलेख या गोष्टी कारणीभूत आहेत!


        दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.

       २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता.  विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हटले आहे.

     कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे.
      विराटला 2018 मध्ये खेलरत्न पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.        डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते. त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली. 

    त्याने ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का शर्माशी लग्न केले.          कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो.

        कोहलीच्या सांगण्यांनुसार, फुटबॉल हा त्याचा दुसरा आवडता खेळ आहे.मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे या संस्थेचे मुळ उद्देश आहेत.


     

विराट कोहली |Khasmarathi
विराट कोहली| व्यक्तीविशेष |Khasmarathi

विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द

◆ 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मध्ये पदार्पण

◆ 18 ऑगस्ट 2008 रोजी साऊथ आफ्रिका विरुद्ध  वनडे क्रिकेट मध्ये पदार्पण

◆ 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध टी 20 मध्ये पदार्पण.

★  डोमेस्टिक क्रिकेट मध्ये 2006 साठी दिल्ली टीम कडून खेळला.

● 2008 पासून रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून तो खेळतोय.

■ आतापर्यंत विराट ने 82 कसोटी सामने खेळले आहेत. 

==>  त्यात 7066 रन्स बनवताना 26 शतके आणि 22 अर्धशतके बनवले आहेत सरासरी 54.44 तर 254 *रन्स ही त्याची सर्वाधिक खेळी आहे.

◆ वनडे मध्ये आतापर्यंत 239 सामने खेळले आहेत त्यात 11520 रन्स बनवताना 43 शतके व 54 अर्धशतके बनवले आहेत सरासरी 60.31 आहे तर 183 ही सर्वाधिक खेळी .

 ■ टी 20 मध्ये 71 सामने खेळले आहेत त्यात 50 च्या सरासरीने 22 अर्धशतके केली आहेत तर 90* ही सर्वाधिक खेळी आहे.

विराट कोहलीची कॅप्टन म्हणून कारकीर्द:-


■ विराट कोहलीने कसोटी मध्ये 51 सामने कॅप्टन म्हणून खेळले आहेत.

● त्यापैकी 31 सामने जिंकले आहेत 10 सामन्यात हार तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.


या पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराट कोहलीचा हा विक्रम..

■ वनडे मध्ये कॅप्टन म्हणून 80 सामने खेळले आहेत.

● त्यापैकी 58 जिकले आहेत तर 19 मध्ये हार पत्करावी लागली. एक सामना टाय आणि दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

■ टी 20 मध्ये म्हणावं अस यश कोहली ला भेटलं नाही. आतापर्यंत 27 सामने कॅप्टन म्हणून खेळले आहेत त्यात 16 जिंकले आहेत व 10 मध्ये हार तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे..


विराट कोहली |Khasmarathi
विराट कोहली| व्यक्तीविशेष |Khasmarathi


★ विराट कोहली फलंदाज म्हणून  रेकॉर्ड ★


- फास्टेस्ट वनडे मध्ये शतक 52 बॉल

- फास्टेस्ट 1000 धावा करणारा भारतीय.

- फास्टेस्ट 5000 धावा करणारा व जगात तिसरा भारतीय बॅट्समन

- 6000 आणि 7000 धावा जलद  पूर्ण करणारा भारतीय तर जगात दुसरा

- फास्टेस्ट 8000,9000,10000 धावा पूर्ण करणारा एकमेव क्रिकेटर


- फास्टेस्ट  10 शतके पूर्ण करणारा भारतीय .

- फास्टेस्ट इंडियन आणि जगात दुसरा 15 ,20,25 शतके पूर्ण करणारा क्रिकेटर.

- जगात फास्टेस्ट 30,35,40 शतके पूर्ण करणारा एकमेव क्रिकेटर.

- फास्टेस्ट 1000 धावा पूर्ण करणारा जगात दुसरा खेळाडू.

- फास्टेस्ट15000 इंटरनॅशनल धावा पूर्ण करणारा एकमेव खेळाडू.

- सगळ्या फॉरमॅट मध्ये जलद 50 शतके करणारा जगात दुसरा खेळाडू 348 इंनिंग मध्ये .

- सगळ्या फॉरमॅट मध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असणारा खेळाडू .

- सगळ्यात जास्त दुहेरी शतके मारणारा भारतीय(7शतके)

- 1 कॅलेंडर वर्षात कसोटीमध्ये सगळ्यात जास्त धावा करणारा भारतीय(1138 रन्स)


असे बरेच रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहेत.

   अशा या एक सर्वोत्तम फलंदाज असलेल्या व्यक्तिमत्त्वाला खासमराठी तर्फे भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥Post a Comment

Previous Post Next Post