एक संघर्षमय जीवनप्रवास - जॅक मा !! | व्यक्तीविशेष || Khasmarathi
एक संघर्षमय जीवनप्रवास - जॅक मा !! | व्यक्तीविशेष || Khasmarathi


 एक संघर्षमय जीवनप्रवास - जॅक मा !! | व्यक्तीविशेष || Khasmarathi


" कधीही हार मानू नका, आजचा दिवस कठीण आहे, उद्या आणखी वाईट होईल, परंतु परवाचा दिवस सूर्यप्रकाश असेल." 
       ~ जॅक मा . 


          माणसं त्यांच्या आयुष्यात सफल कशी होत असतील बरं... ? त्या मागच कारण शोधायला गेलं कि काहीच उत्तर मिळतात.  माणसं असतात ध्येयवेडी, कि...  असं म्हणावं लागेल त्यांना आपलं ध्येयच माहित नसावं... त्यांना फक्त एवढच माहित कि कठोर परिश्रम करत राहणे ते हि फळाची अपेक्षा न करता.

                    अमीर खान ची ती फिल्म "जो जिता वही सिकंदर " मधील गाणे आपण चालीत म्हणतो  " पापा कहते है बडा नाम करेगा , बेटा हमारा ऐसा काम करेगा , मगर यह तो कोई ना जाणे कि मेरी मंझिल है कहा."

                    आपल्या आयुष्यात काही वेळा असच काहीस घडत असत.आपल्याला आपलं ध्येयच माहीतच नसत, फक्त आपल्याला त्या प्रवाहात वाहत राहणे एवढाच माहित असत. मग तो प्रवाह आपल्याला कुठे घेऊन जाईल तिकडे आपण जातो.


                      काही सफल व्यावसायिक सांगतात, माणूस मरेपर्यंत काहीना काही शिकत राहतो , तो स्वता:मध्ये ज्ञानाचे भांडार विकसित करत असतो आणि हवं तेव्हा तो त्याचा वापरही करतो. आता यालाही काही अपवाद आहेतच कि, कोणी किती ज्ञान घेतलं आणि त्याचा वापर आयुष्यात करून काय साध्य केलं?

            थोडक्यातच काय तर स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मग लक्ष्यात येईल कि आपली स्तिथी काय आहे आणि जग कुठे चाललय. वाचलेली पुस्तके आणि आलेला अनुभव माणसाचे आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरतात. अशा व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचे झाले तर ते असतिल ' जॅक मा '.

     अलीबाबा ग्रुप चे संस्थापक जॅक मा यांचा जन्म १० सप्टेंबर १९६४ साली हांगजोऊ, चीन मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मा लेइफा आणि आई चे नाव सुई वेंसाई होते, जॅक मा यांचे खरे नाव 'मा युन' असे होते. जॅक मा यांचा  परिवार चीन मध्ये पारंपरिक संगीतकारी चे काम करायचे.  जॅक मा यांच्या परिवाराची कमाई फार कमी असायची. मात्र  गरीब असून देखील ते समाधानी  असायचे. जॅक मा यांना इंग्रजी शिकण्याचा ध्यास लागला होता पण गरीब असल्या कारणाने ते इंग्रजी शिकवणी लावू शकले नाहीत, त्यांनी त्यांचा ध्यास कधी सोडला नाही ते इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या सायकल वरून एका हॉटेल मध्ये जायचे जिथे विदेशी लोक येऊन राहायची.  तिथे जाऊन जॅक मा त्यांच निरीक्षण करायचे कि ते कसे इंग्रजी बोलतात त्याचा अर्थ काय होतो. तसेच त्यांच्या सोबत बोलायचा प्रयत्न देखील करायचे. त्यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांचे काही विदेशी मित्र बनले त्यातल्याच एका मित्राने त्यांच नाव 'जॅक मा' ठेवले.

     जॅक मा महाविद्यालयात जाण्यासाठी मेहनत घेऊ लागले. चायनीज प्रवेश परीक्षा जी वर्षातून एकदाच घेतली जाते ती उत्तीर्ण व्हायला जॅक मा यांना चार वर्षे लागली. मा यांनी हांगजोऊ टीचर इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घेतला आणि बी ए इंग्लिश मधून १९८८ साली उत्तीर्ण झाले. जेव्हा जॅक मा विद्यालयात शिकायला होते तेव्हा विद्यार्थी परिषदेचे प्रमुख होते. महाविद्यालयातुन उत्तीर्ण झाल्यानंतर ते हांगजोऊ डियांजी युनिव्हर्सिटी मध्ये लेक्चरर राहिले.

     जॅक मा यांनी आपली व्यासायिक कारकिर्दी सुरु करताना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी जेव्हा पोलिस क्षेत्र निवडले तेव्हा मुलाखतीत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले कि तुम्ही या कामासाठी लायक नाहीत. त्याकाळची प्रसिद्ध कंपनी केएफसी मध्ये सुद्धा कामासाठी अर्ज केला,अर्ज करणाऱ्या एकूण २४ लॊकांपैकी जॅक मा यांना सोडून २३ लोक निवडले जातात. हा काळ त्यांच्यासाठी खूप वाईट असा होता पण त्यांनी प्रयत्न करणे कधीच सोडले नाही .

     १९९४ साली त्यांनी पहिल्यांदा इंटरनेट हा शब्द ऐकला त्याचकाळी त्यांनी पहिली कंपनी सुरु केली तीच नाव 'हांगजोऊ ट्रान्सलेशन एजंसी' . १९९५ साली ते त्यांच्या विदेशी मित्रांसोबत विदेशी गेले तसेच त्यांच्या विदेशी दोस्तांनी त्यांना इंटरनेट वापरायल शिकवले. जॅक मा यांनी प्रत्येक देशाविषयी इंटरनेटवर माहिती शोधली ते करत असताना त्यांनी आपल्या देशाविषयी (चीन) माहिती मिळवायचा प्रयत्न केला पण इंटरनेट वर त्या बद्दल तिथे माहितीच उपलब्ध नव्हती. हि त्यांच्यासाठी आश्चर्य जनक गोष्ट होती. मा व त्यांच्या मित्रांनी मिळून एक ' Uguly ' नावाची वेबसाइट बनवली जी चीन विषयी माहिती द्यायची. त्यांनतर त्यांच्या आयुष्याला जशी एक कलाटणीच मिळाली. चीनच्या व्यायवसायिकांची पत्रं  (इ -मेल्स) जॅक मा यांना मिळू लागली . इथून पुढे कधीच मागे वळून पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले.  सन १९९५, एप्रिल मध्ये जॅक यांनी यिबिंग नावाच्या संगणक शिक्षकासोबत मिळून चीन पेजेससाठी ऑफिस खोलले, आणि दुसऱ्या कंपनीची स्थापना केली. ते चीन च्या कंपन्यांना वेबसाईट बनवून विकायचं काम करू लागले. त्यांनी पहिल्यांदा संगणक खरेदी केला तेव्हा ते ३३ वर्षांचे होते.

     ऑक्टोबर १९९९ साली त्यांनी अमेरिका सोडायचा निर्णय घेतला व स्वदेशी (चीन) परतले. आपल्या १८ विदेशी मित्रांसोबत मिळून 'अलीबाबा कंपनी ' ची स्थापना  केली. कंपनीचे नाव अलीबाबा ठेवण्यामागे पण एक किस्सा तो असा कि , जॅक एकदा कॉफी शॉप मध्ये बसले असताना त्यांनी तिथल्या वेटर ला विचारले कि तुम्ही अलीबाबा ला ओळखता का ? त्यावर तो म्हणाला हो ,खुलं जा सिमसिम वाला . असेच त्यांनी वेगवेगळ्या देशातील व्यक्तीना अलिबाबा नावा बद्दल विचारले तेव्हा त्या सर्वांना अलीबाबा विषयी माहित होते आणि त्यांनी आपल्या कंपनीचे नाव अलीबाबा ठेवण्याचा निर्णय घेतला.अलीबाबा ग्रुप ऑफ कंपनीस ने पूर्ण विश्वात आपला दबदबा निर्माण केला.

      २०१५ पर्यंत , जॅक मा यांची पूर्ण संपत्ती २३.१ बिलियन होती तसेच ते जगातील ३३ वे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राहिले. तर चीन मधले दुसरे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. अशा या जॅक मा यांच्या जीवनातील काहीं कठीण प्रसंगातून खूप काही शिकायला मिळते , ध्येय प्राप्ती पर्यंत पोहोचताना परस्थिती आडवी येत नसते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

     जॅक मा यांनी जगासमोर काही अनमोल विचार मांडले त्यातील काही विचार :

१)  तुम्ही तुमच्या विरोधकांकडून शिकल पाहिजे, कधीच कोणाची नकल करू नये असं केल्यास समजून जा कि तुम्ही अपयशाच्या टेकडीवर उभे आहात.

२)  आपल्याकडे कधीच पैशांची कमी नसते , कमी असते ती त्या लोकांची जे स्वप्न पाहतात व ते सत्यात उतरवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतात.

३)  जॅक मा म्हणतात कि , माणसाने यशस्वी माणसाच्या यशातून शिकण्यापेक्षा त्यांनी केलेल्या चुकांतून शिकले पाहिजे.

४) यशस्वी व्हायचं असेल तर संयमी गुण अंगी बाळगला पाहिजे .

          खरच या माणसाकडून आपण किती आणि काय काय शिकू शकतो ना ? तुमच्या आयुष्यात देखील अपयश आले तर खचू नका कारण आयुष्यात तुम्ही देखील हवे तेवढे प्रचंड यश नक्की मिळवू शकता!


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने