राजगड किल्ला - मराठी राज्याची पहिली राजधानी | भटकंती || Khasmarathi
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळचा एक ऐतिहासिक महत्त्व असणारा किल्ला आहे. या किल्ल्याची सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात विशेष गोष्ट ही आहे की, याच किल्ल्यावर श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची होय, त्या सुराज्य आणि मराठी राज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला पुण्यापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर आहे.
![]() |
राजगड किल्ला - मराठी राज्याची पहिली राजधानी | भटकंती || Khasmarathi |
राजगड कडे प्रवास करताना.......!
राजगड किल्ल्याकडे जर तुम्ही हडपसर किंवा सासवड मार्गे जात असाल, तर तुम्हाला नारायणपूर पासून केतकावले येथे पुणे बेंगलोर हायवे ला निघावे लागेल आणि तिथून विरुद्ध बाजू म्हणजेच तिथून थोडं वापस म्हणजेच कापूरहोळ पासून नसरापूर कडे जावं लागेल. तिथून गुंजवणे असा प्रवास राहील.मात्र, जर तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा वारजे माळवाडी किंवा डायरेक्ट बंगलोर हायवे वरून येत असाल तर तिकडून पण नसरापूर मार्गच यावं लागत गुंजवणे गावात तुम्हाला वाहनाची पार्किंग करावी लागते तिथे पार्किंग ची सोय आहे आणि पुढे कुठलीच गाडी जात नाही आणी मग तिथुन तुम्हाला ट्रेक करायला लागते.
ट्रेक स्टार्ट करताना 2 रस्ते पाहायला मिळतील पण डाव्या बाजूचा रस्ता जवळ वाटत असेल तरीपण तो खूप खडतर आहे .तत्पूर्वी तुम्हाला सोबत खाण्यासाठी व पाण्याचा साठा घ्यावा लागेल कारण किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही
.तुम्ही डाव्या बाजूने जात असाल तर साधारण 3 तास लागतात आणि तुम्हाला पायवाटेने जावं लागेल .राजगड च्या जंगलात प्राणी पक्षिसाठी अभयारण्य आहे आणि ठिकठिकाणी माहिती देणारे फलक आहेत तसेच बरेच फुल फळांची झाडे समृद्ध करतात .
![]() |
राजगड किल्ला - मराठी राज्याची पहिली राजधानी | भटकंती || Khasmarathi |
![]() |
काय काय पाहायला मिळेल.......?
1)संजीवनी माची
2)पद्मावती मंदिर
3)पद्मावती माची
4)आलू दरवाजा
5)पाली दरवाजा
6)सुवेळा माची
7)बालेकिल्ला
8)आणि तिथून दिसणारा तोरणा आणि सिंहगड
या सगळ्या गोष्टी पाहायला विसरू नका , पाहायला वेळ नक्की जास्तीच लागेल मात्र सगळ्या गोष्टीं पहायला नंतर आपल्याला यायला मिळेल की नाही म्हणून ही संधी सोडू नका!
किल्ले ही फक्त काही ऐतिहासिक ठिकाणे नसून आपल्या संस्कृतीची ओळख , आपल्या इतिहासाचे वैभव दाखविणारे तसेच प्रत्येक इतिहास प्रेमीचा ज्वाजल्य अभिमान आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहेत ! म्हणून स्वतःअशा कोणत्याच गडावर कोणतेही चुकीचे अशोभनीय काम करणार नाहीत व इतर कोणाला करू द्यायचं नाही याची विशेष काळजी घ्या! काळाच्या ओघात जरी किल्ल्याची खुप पडझड झालेली असली तरी देखील या किल्ल्यावर प्रत्येक ठिकाणी इतिहासातील वैभवाची अनुभूती आल्याशिवाय रहात नाही.
राजगड वरून प्रत्येक पॉइंट खूप भारी दिसतात राजमाची असो की संजीवनी माची त्यामुळे इतिहासात गेल्यासारखं वाटत आणि श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी कश्या पद्धतीने किल्ले लढवले असतील याचे चित्र उभे राहते.
सर्व ठिकाणे लवकर बघून होतील याची काळजी घ्यावी लागते कारण अंधार पडल्यास ट्रेक करणे अवघड जाते. त्याचबरोबर उतरताना देखील रस्ते निसरडे बनतात .या गोष्टी लक्षात ठेवण गरजेचं आहे
तसेच चुकीच्या ठिकाणी उभारून फोटो काढणे किंवा कुठल्याही गोष्टींचा अपमान होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे अश्या पद्धतीने राजगड ट्रेक तुम्ही करू शकता.
आणि तुम्हाला कुठल्या किल्ल्याविषयी माहिती हवी असेल तर कंमेंट करा आम्ही त्या किल्ल्याविषयी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू! धन्यवाद🙏🙏
Must JOIN :-
📌🚩 *खासमराठी* चे *दर्जेदार* updates , नवीन नोकरीच्या संधी , स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन , तंत्रज्ञान असेच बरेच काही थेट आपल्या व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
Also Read....
अभ्यासाच्या दृष्टीने हे खूपच महत्वाचे आहे.
➤ पोलिस भरती Police Bharti 2019 शारीरिक क्षमता चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
➤ Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti
Guidance in Marathi - 1
➤ Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti
Guidance in Marathi - 2
➤ स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात? - 3
➤ कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची || स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन - 4
➤ MPSC Rajyaseva Pre Syllabus 2020 (Marathi & English Pdf) | MPSC
Syllabus - 6
➤ MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल || MPSC
संपूर्ण मार्गदर्शन || मराठी - 7
➤ Mpsc Test Quiz || Spardha pariksha

Nice blog
उत्तर द्याहटवाthanks
हटवाटिप्पणी पोस्ट करा