स्वप्नपूर्ती पर्यंतचा प्रवास..... !!। बिल गेट्स । व्यक्तीविशेष। Khasmarathiयश हा असा शिक्षक आहे जो  लोकांना भुरळ पडतो कि ,

तुम्ही कधीच अपयशी होऊ शकत नाही .


     असा अनमोल विचार देणाऱ्या जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स याना न ओळखणारी एकही व्यक्ती नसेल . त्यांनी खूप सारी संपत्ती कमावलीच पण असे विचार सुद्धा सांगितलेत त्याच अनुकरण जर आपण आपल्या जीवनात केलं तर आपण नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचू शकतो. आज तंत्रज्ञानाच्या युगात बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा सिंहाचा वाटा आहे . कोणत्याही मनुष्याला सफलता हि अशीच मिळालेली नसते त्या मागे एक खडतर प्रवास असतो तो कोणालाही माहित नसतो. आपण फक्त विचार करत राहतो कि श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून प्रगती पथावर पोहचली असेल पण त्या व्यक्तीच तिथं पर्यंत पोहचणं किती कष्ट दायक आणि चढउताराचे असेल याचा आपण स्वप्नांतही विचार करू शकत नाही .अशाच प्रगतीचे शिखर जर तुम्हाला पार करायचा असेल तर तुम्हाला जिद्दी बनलं पाहिजे ,ध्येय वेडे व्हावे लागेल , काही गोष्टींचा त्याग करावा लागला तर ते हि करण्याची तयारी असावी व तत्व निष्ठ राहिले पाहिजे.

      सिएटल ,वॉशिंग्टन मध्ये २८ ऑक्टोबर १९५५ साली जन्मलेले विलियम हेंरी गेट्स हे एक अमेरिकेन बिजनेसमन , गुंतवणूकदार, लेखक, परोपकारी आणि मानवतावादी आहेत  तसेच मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य संस्थापक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या आईचे नाव मरीया मक्सेल गेट्स व वडिलांचे नाव विलियम गेट्स होते.त्यांना दोन बहिणी देखील होत्या त्यांच्या आईने प्रथम आंतरराज्यीय बॅंकसिस्टम आणि युनायटेड वे ऑफ अमेरिकेच्या संचालक मंडळावर काम केले तर वडील एक प्रख्यात वकील होते .

     वयाच्या १३ व्या वर्षी ते खासगी लेकसाइड प्रीप स्कूल मध्ये दाखील झाले.सिएटल नामक कंपनीने विद्यार्थ्यांना शिकण्याच्या व जाणून घेण्यासाठी लेकसाइड स्कूलला संगणक दिला होता त्याच दिवसात त्यांनी स्वतःचा पहिला सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहिला. त्यांना प्रोग्रामिंग मध्ये फार रस होता व त्यांनी अशा मशीन वर पहिला कॉम्पुटर प्रोग्राम लिहला जो  एक खेळ खेळण्यासाठी होता (टिक टेक टो) लोक कॉम्पुटर विरोधात खेळू शकत होते . बिल गेट्स हे संगणकाकडे आकर्षिले जायचे आणि ते प्रत्येक वेळी सॉफ्टवेअर कोड अचूक  अमलात आणायचे. त्यांना कायम कुतूहल वाटायचे कि संगणक काम कसे करतो त्यासाठी ते जास्तीत जास्त वेळ संगणक वर घालवायचे . ते त्यांच्या अन्य सहकार्यांसोबत डीइसी ,पीडीपी , मिनी संगणकावर नवीन गोष्टी शिकू लागले .त्यांच्यातीलच पीडीपी १० कॉम्पुटर सेंटर कॉर्पोरेशन (सीसीसी ) च होते. बिल गेट्स व त्यांचे मित्र सहकारी पॉल एलन आणि रिक वेईलंड यांचावर प्रतिबंध घालण्यात आला कारण त्यांनी संगणकाची कमजोरी चा चुकीचा फायदा घेतला . वयाच्या १७ वर्षी त्यांनी एलन पौल सोबत मिळून तरफ-ओ -डाटा  नावाचा असा कॉम्पुटर प्रोग्राम बनवला जो शहरातील वाहतूक नियंत्रण करायचा. त्यासाठी त्यांना वीस हजार डॉलर्स मिळाले .तीच त्यांची त्यांच्या आयुष्यातील पहिली कमाई  होती.

स्वप्नपूर्ती पर्यंतचा प्रवास..... !!  । बिल गेट्स । व्यक्तीविशेष। Khasmarathi
स्वप्नपूर्ती पर्यंतचा प्रवास..... !!  । बिल गेट्स । व्यक्तीविशेष। Khasmarathi

     १९७३ साली बिल स्कूल मधून उत्तीर्ण झाले आणि परीक्षेत १६०० पैकी १५९० गुण मिळवले ज्यामुळे त्यांना हरवॊर्ड युनिव्हर्सिटी मध्ये सहज प्रवेश मिळाला. त्यांच्या वडिलांचे म्हणणे असे होते कि त्यांनी वकिली क्षेत्र निवडावे पण बिल गेट्स ना वकिली क्षेत्रात रुची नव्हती , ते आपला जास्तीत जास्त वेळ युनिव्हर्सिटी च्या कॉम्पुटर विभागात घालवायचे .१९ वर्षाच्या वयात बिल गेट्स यांनी एलन पौल सोबत मिळून ४ एप्रिल १९७५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनी ची स्थापना केली आणि एड रॉबर्ट्स कंपनी सोबत काम करू लागले. त्यानंतर त्यांच्या कंपनीने मार्केट मध्ये खूप यश प्राप्त केले . कॉम्प्युटर्सची खरेदीदारी हि वाढली त्याच काळात बिल गेट्स यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी सोडण्याचा निर्णय घेतला. 

     १९८० साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने असा प्रस्ताव आला कि तिथून त्यांचे आयुष्य बदलून गेले , कॉम्पुटर बनवणारी त्या काळची जगातील सर्वात मोठी कंपनी आय बी एम ने आपल्या नवीन वैयक्तिक कॉम्पुटरसाठी सॉफ्टवेर बनवण्याचा प्रस्ताव मांडला. आय बी एम कंपनीसाठी त्यांनी एक ऑपरेटिंग सिस्टिम बनवली एम यस डॉस (MS DOS). हे सॉफ्टवेअर आय बी एम (IBM) कंपनीने ५० हजार डॉलर्स ला विकत घ्यायचे सूचित केले पण बिल यांनी ते अमान्य केले कारण आय बी एम च्या कॉम्पुटर सोबत त्यांना पैशे कमवायचे होते त्यांची चलाखी व हुशारी इथूनच दिसून येते. आय बी एम कंपनी ला त्यांचा कॉम्पुटर चालवण्यासाठी एम यस डॉस सॉफ्टवेअर चे लायसेन्स फी द्यावी लागायची. आय बी एम सोबत आणखी कंपन्या कॉम्पुटर मार्केट मध्ये उतरल्या त्यांना देखील मायक्रोसॉफ्ट ने एम एस डॉस सोपेरेटिंग सिस्टिम सॉफ्टवेअर द्यायचे ठरवले.

     १९८५ सालापर्यंत मार्केट मध्ये जेवढे कॉम्पुटर होते त्या पैकी ३०% कॉम्पुटर मध्ये मायक्रोसॉफ्ट चे सॉफ्टवेअर चालायचे. बिल मायक्रोसॉफ्ट चे प्रेसिडेंट व एलन वाइस प्रेसिडेंट होते काही  काळानंतर एलन आजारी पडले त्यामुळे त्यांना कंपनी कडे लक्ष देता येत नव्हते त्यामुळे त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडायचा निर्णय घेतला .

     १९८६ साली बिल यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नवीन ऑपरेटिंग सिस्टिम मार्केट मध्ये आणले ,ज्या मध्ये कोणी पण माउस च्या साहाय्याने सहजरित्या कॉम्पुटर हाताळू शकत होते आणि तिथून पुढे मिक्रोसॉफ्टने आपल्या कंपनीला सार्वजनिक केले. आणि असेच यश संपादित करत वयाच्या ३१ वर्षी बिल गेट्स अरबपती बनले.१ जानेवारी १९९४ मध्ये बिल यांनी त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या मलिंडा फ्रेंच शी विवाह केला.

      १९९५ साली मिक्रोसॉफ्ट ने नवीन सॉफ्टवेअर लॉन्च केले (विंडोस ९५) वयाच्या ४२ वर्षापर्यंत बिल गेट्स अमेरिकेत राहणारे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले ज्यांच्याकडे ५० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त संपत्ती होती. आज  ९० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असेल.

       बिल गेट्स यांना दोन मुली व एक मुलगा आहे पण इतकी संपत्ती असताना देखील बिल गेट्स यांनी आपल्या संपत्तीतील १० मिलियन डॉलर्स त्यांच्यासाठी ठेवले आहेत. आणि त्यांना या गोष्टीबद्दल विचारल्यावर ते सांगतात मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण देईन एवढी सारी संपत्ती त्यांच्यासाठी ठेवून जाणे त्यांच्यासाठी चांगले नाही , मी जेवढी संपत्ती मिळवली ती तिथेच (समाजातच) राहिली पाहिजे .

       २०१४ साली बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट मधले पद सोडले व सत्या नाडेला याना कंपनीचे सी ईओ(CEO) बनवले ते एक भारतीय आहेत. बिल गेट्स त्यांच्या पत्नीसोबत मिळून एक एनजीओ चालवतात ..

बिल गेट्स यांनी सांगितलेले काही अनमोल विचार :

१)  संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे .

२)  तुम्हाला मोठ्या फरकाने जिंकायचे असेल तर मोठी जोखीम पत्करावी लागेल .

३) मी आळशी लोकांना कामावर ठेवतो , जेणे करून ते काम कारण्याच्या सोप्या पद्धती शोधून काढतील.

४) यश हा असा शिक्षक आहे जो स्मार्ट लोकांना भूरळ पडतो कि तुम्ही पराजित होऊ शकत नाही .


विंडोज आवृत्ती रिलीज तारीख समर्थन स्थिती
विंडोज १.० २० नोव्हेंबर १९८५ ३१ डिसेंबर २००१
विंडोज ३ २२ मे १९९० ३१ डिसेंबर २००१
विंडोज ९५ २४ ऑगस्ट १९९५ ३१ डिसेंबर २००१
विंडोज २००० १७ फेब्रुवारी २००० १३ जुलै २०१०
विंडोज xp २५ ऑक्टोबर २००१ ८ एप्रिल २०१४
विंडोज ७ २२ ऑक्टोबर २००९ १४ जानेवारी २०२०
विंडोज ८ ऑक्टोबर २०१२ १२ जानेवारी २०१६
विंडोज ८.१ १७ ऑक्टोबर २०१३ १० जानेवारी २०२३
विंडोज १० २९ जुलै २०१५ ९ जानेवारी २०२९


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने