Social Media वरील एक विशिष्ट वर्ग - आजच दाखला घेऊ | वैचारिक ।। Khas Marathi        


                 काही लोकांना जरा कुठे काही घडलं की सश्या सारखं आभाळ उठवायची सवय असते.... !

                          कुठला शासकीय निर्णय असो (उदा. नोटबंदी) ....गावात घडलेली घटना असो अथवा काहीही म्हणजे काहीही असो........

                   धडाधड पोस्टी....त्यावर गप्पा गोष्टी...कधी तारीफ....कधी निषेध....वगैरे वगैरे.... यांमध्ये मी पण आजपर्यंत यायचोच म्हणा... ;)


                       यांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की व्हायची ती म्हणजे कुठल्यातरी एकाच  बाजू  ला जाणे.... मग ती सरकारची बाजू असो अथवा विरोधकाची.... यामध्ये जितक्या लोकांची मतं वाचायचो त्यांच Brainwash झालेलं दिसायचं.....म्हणजे ते कट्टर असतात....कधी आपल्या जातीच्या नावाखाली... कधी मातीच्या नावाखाली...कधी कुण्या पक्षाच्या कधी विपक्ष म्हणून..कधी कट्टर समर्थक .....कधी कट्टर विरोधक....जे खरं आहे त्याला खरं जे चूक आहे त्याला चूक मग ती आपल्याच मुलाने केलेली चूक का असेना....कान धरून हे चूकच आहे असे दाखवणारे मात्र बोटावर मोजण्याइतकेच होते!


तुमचा कोणी BRAINWASH तर करत नाही ना ? | खास मराठी 
                                                        www.khasmarathi.com


                      साध्य काय? भांडायचं रान उठवायचं.... आभाळ फाटलं ....आभाळ फाटलं म्हणायचं...आणि  सातच  दिवसांनी परत दुसरा विषय ...शेवटी तेच तेच....!


                        मात्र एक वर्ग ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, तो म्हणजे असा वर्ग ज्याला काहीही होवो.... even खरोखरच आभाळ फाटलं तरी घंटा काहीच फरक पडत नाही....यापुढे आपण तर त्याच वर्गात जायचं ठरवलं आहे यंदा, तेही आजच admissiom घेऊन :p


                          Traffic चे नियम बदलले तर ही लोकं त्यावर कुठे मत मांडत नाहीत .... न विरोध न समर्थन...न कधी भांडण न कोणाशी कसला कुठे वाद .....even एक दोनदा fine जरी लागला तरी देखील....हे विशेष कौतुकास्पद!                              गाडी सोडायची cycle वापरायची....बस मधून रेल्वे तून जमत नसून देखील कसलीच तक्रार न करता हसत खेळत गर्दीतून प्रवास करायचा....थांबायच मात्र नाय!!


                   खरोखरच गावात घरापर्यंत पूर नव्हे महापूर जरी आला तरी देखील जमेल तितक्या हिमतीने लढा देत रहायचे.... शासनाने मदत दिली तर धन्यवाद मानायचे, नाही दिली तरी आपापल्या परीने जमेल तितके प्रयत्न करायचे.... !!

                         मला तरी वाटतं अशा माणसांना कधीच कोणीच हरवूच शकत नाहीच....आणि यांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कोणीच हिरावू शकत नाही...कारण हे हास्य.... ती smile हीच त्यांची ओळख असते....हाच त्यांचा Trademark असतो..... Lifetime....Forever!!

मग जमल तर तुम्ही पण या गटात आजच सामील व्हा! होताय ना?


 ~S.J.
 -11/09/2019
 @12:08pm

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने