#जीवनाचं_प्रयोजन | वैचारिक ।। Khas Marathi


     व्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक मानसरोगतज्ज्ञ होता. तो जर्मन होता, ज्यू होता. म्हणून तो जर्मनीच्या काँन्सन्ट्रेशन कँम्पमध्ये कैदी होता. तिथे भयंकर छळ चालायचा. सुटण्याची आशा नाही. त्या छळाला त्रासून दर दोन चार दिवसांनी एखादा कैदी आत्महत्या करायचा. त्याच्या लक्षात यायला लागलं की, आपल्या मनात आत्महत्येच विचार हळूहळू यायला लागलेत. तो शोधायला लागला की, हा विचार कसा थांबवू? इतर कैद्यांचे पण विचार कसे थांबवू ?

व्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की - जगण्यासाठी एक अपूर्ण स्वप्न, करायचं जीवनकार्य शोधलं- फुलवलं की जगण्याला प्रयोजन प्राप्त होऊन आत्महत्येचा विचार दूर होतो.

त्याचं , "मँन्स सर्च फाँर मीनिँग" हे सुंदर पुस्तक आहे.
त्यात तो एक कळीच वाक्य लिहितो -

"THOSE WHO KNOW THE WHY OF LIVING HAVE NO PROBLEMS ABOUT THE HOW OF LIVING. "

मी का जगतो याचं उत्तर ज्यांना सापडलं , त्यांना कसं जगावं हा प्रश्न सतावत नाही. तो प्रश्न सोपा होऊन जातो. मला 2कपडे हवेत की 4 हवेत? मला घर 2खोल्यांच हवं की 4 ? हे सगळे प्रश्न गैरलागू होऊन जातात. बिनमहत्त्वाचे वाटतात.

To be continued . . . . .

~S.J.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने