नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणाऱ्यांनी नक्की वाचा..


   नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणे म्हणजे शरीराचे शुद्धीकरण , विषारी घटकांना बाहेर टाकणे तसेच पचन आणि सकारात्मकता वाढविण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे .

   उपवास करण्याचे फायदे भरपूर असले तरी आपल्यातील बरेच जण चुकीच्या पद्धतीने उपवास करतात ज्यामुळे शरीरातील समतोल बिघडू शकतो.

   नवरात्रीत पूर्ण नऊ दिवस उपवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे, काही जण नऊ दिवस फक्त पाणी पिऊन हा उपवास साध्य करतात तर काही जण फलाहार सेवन करून.

   फलाहार केल्यावर लगेच पाण्याचे सेवन करू नका.

   नवरात्रोत्सवातील उपवसात फलहाराचं सेवन करत असाल, तर ते आरोग्यास उत्तम आहेच, मात्र फलहार करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. फलहारात फ्रूट सॅलड खात असाल तर त्यावर पाणी जवळ-जवळ सगळेच पितात, परंतु फ्रूट सॅलड खाल्ल्यानंतर पाणी न पिणे तुमच्या फायद्याचं ठरू शकते.

   याचं कारण असं की फळांमध्ये फायबर सोबत यीस्ट च प्रमाण अधिक असतं. व त्यावर पाणी पिल्यास पोटात गॅस निर्माण होऊन पोट फुगण्याची शक्यता वाढते.
 
   सोबतच फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, व फळांवर पाणी पिण्याने अतिसराचा धोका निर्माण होतो.
 
   हे सर्व टाळण्यासाठी फ्रूट सॅलड/फळे खाल्ल्यानंतर पाऊण तासानंतर पाण्याचे सेवन करा.

   नेमके खा.

   फळं जास्त प्रमाणात खाणे टाळा. फळांमध्ये उच्च प्रमाणात सुक्रोज,  आणि यीस्ट असतं. फळांमध्ये अधिक प्रमाणात असणारे सुक्रोज, फ्रूक्टोज सोबत यीस्ट यांचे अती सेवन पोट दुखी व पोटाच्या इतर व्याधींना निमंत्रण आहे .


   खाताना सावकाश व नीट चाऊन खा.

   बकाबका खाल्ल्याने पोटात कार्बनडाय ऑक्साईड चा निर्माण वेगाने होऊन गॅस चा त्रास होऊ शकतो, पोट जड, पित्त, ढेकर येणे हे त्रास देखील होऊ शकतात. याविरुद्ध नीट चाऊन खाल्ल्याने हेच त्रास दूर होण्यास मदत होते.

   योगासनाची साथ.

   उपवासा सोबतच हलके फुलके योगासने, स्ट्रेचिंग शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया वेगवान करते.

   तणावमुक्त रहा. 

   या उपवसा दरम्यान शरीरात ऊर्जेचे प्रमाण कमी होते, म्हणून शरीरावर व मनावर कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण होऊ नये याची काळजी घ्या.
 
   जागरण टाळा. 

   शरीरातील विषारी घटकांचं उत्सर्जन रात्री झोपलेल्या अवस्थेत होते, म्हणून दिवसात कमीत कमी 8 तासाची झोप तितकीच महत्त्वाची आहे.


नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवी माता तुमच्या आयुष्यात

आरोग्य | धन | सुख | समृद्धी | बुद्धी | प्रसिद्धी | कीर्ती | भक्ती | शांती 

यांची भरभराट घेऊन येवो हीच खासमराठी परिवारातर्फे प्रार्थना.

व सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने