तलाठी पदभरती 2019 | प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया, संपूर्ण मार्गदर्शन | Khasmarathi


                       
                        तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २ जुलै २०१९ ते २६ जुलै २०१९ कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घेण्यात आलेल्या  परीक्षेचा निकाल घोषित झाला असून व निवड झालेल्या उमेदवारांची यादी जिल्हा स्तरांवर घोषित करण्यात येत आहे.
              तुमच्या जिल्ह्याच्या शासकीय पोर्टल वर ही यादी जाहीर झाली असेल, व त्यामध्ये तुमचे नाव असेल तर त्यापुढे काय करायचं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात JUNIOR STARS YOUTUBE CHANNEL वरती  विचारला गेला होता.



                     
                   निवडून आलेल्या उमेदवारांची यादी घोषित झाली असेल तर सदर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. हजर होण्याची तारीख व वेळ ही तुमच्या जिल्ह्याच्या शासकीय पोर्टल वर, उमेदवारांची यादी घोषित केल्या नंतर मिळून जाईल.





          पडताळणी वेळी खाली नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकित २ छायाप्रतींचा संच, स्वखर्चाने नमूद केलेल्या वेळी प्रस्तुत करणे आवश्यक आहे.

   1. संकेतस्थळावर भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट.
   2. नागरिकत्वाचे प्रमाणपत्र (Nationality) मूळ प्रत.
   3. महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबत चे (Domicile) प्रमाणपत्र.
   4. S.S.C. परीक्षेत उत्तीर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र व गुणपत्रिकेची मूळ प्रत.
   5. H.S.C. परीक्षेत उत्तीर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र व गुणपत्रिकेची मूळ प्रत.
   6. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असल्याबाबत गुणपत्रकाची मूळ प्रत व परीक्षा प्रमाणपत्रांची (degree certificate) मूळ प्रत.
   7. शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत.
   8. मागासवर्गीय उमेदवारांनी मूळ जात प्रमाण पत्र, व उपलब्ध असल्या जात वैधता प्रमाणपत्र.
   9.  E.W.S.  प्रवर्गातील उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभागाचे शासन क्र. राअाधो 4019/प्र. क्र. 31/16-अ दि.12/2/2019 अन्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पात्रतेसाठी मूळ प्रमाणपत्र.
   10. S.E.B.C. प्रवर्गातील उमेदवारांनी S.E.B.C. प्रवर्गातील असल्याबाबत समक्ष प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
   11. अ. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांसाठी 31 मार्च  2019 पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र(नॉनक्रिमिलेयेर).
   12.नॉन क्रिमी लेयर चे तत्व अनुसूचित जाती / जमाती व्यतिरिक्त इतर सर्व मागासवर्गीयांना लागू राहील.
   13. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्य असल्यास, कुठुंबस या प्रकरणी मदतीसाठी पत्र ठरविले असल्याचे कागदपत्रे.
   14 . खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेले आरक्षण महिला व बालविकास विभाग संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आरक्षण अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांनी 31 मार्च 2019 पर्यंत वैध  असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे ( नॉनक्रिमिलेयर ) मुळ प्रमाणपत्र .
   15 . अंशकालीन कर्मचारी यांनी त्यांच्या अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडे केलेल्या नोंदणीचे प्रमाणपत्र आणि अंशकालीन कर्मचारी म्हणून कामकाज केले असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे मुळ प्रमाणपत्र .
   16 . माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे नांव नोंदणी केलेबाबतचे प्रमाणपत्र व सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले सैनिकी सेवे संदर्भातील मुळ प्रमाणपत्र .
   17 . अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुसांठी असलेले आरक्षण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र . / राक्रिधो - 2002 / प्र . क्र . 68 / क्रियुसे - 2 , दि . 30 / 04 / 2005 मधील तरतुदीनुसार खेळाडु प्रमाणपत्र हे राष्ट्रीय व राज्यस्तरीय शासन निर्णय परिशिष्ट अ मध्ये नमुद खेळाचे व प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांचे असावे .
   18 . प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवारांनी संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी ( उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ) यांनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त बाबतच्या मुळ प्रमाणपत्राची प्रत .
   19 . अपंग उमेदवारांनी शासन परिपत्रक महसूल व वन विभाग आरईएन - 2892 / प्र . क्र . 127 / ई - 10 दिनांक 10 / 07 / 2008 मध्ये मध्ये नमुद अपंग उमेदवारांचे किमान अपंगत्वाचे प्रमाण 40 % असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे मुळ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
   20 . महाराष्ट्र शासन , माहिती तंत्रज्ञान ( सा . प्र . वि . ) विभागाकडील शासन निर्णय क्र , मातंस 2012 / प्र. क्र. 277 / 39 , दि 04 / 02 / 2013 मध्ये नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक अर्हता परीक्षांपैकी कोणतोही एक अहेत DR . C . Celnaharti 2018R Talathi Mahitina . 20b परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे मुळ प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत M. S. C. I. T. अथवा GECT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मुळ प्रमाणपत्र .
   21 . महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटूबांचे प्रतिज्ञापन ) नियम , 2005 मधील तरतुदीनुसार गट अ ते ड मधील पदांच्या सेवा प्रवेशासाठी एक आवश्यक अर्हता म्हणुन विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील .
   22 . छायाचित्र ओळख पुरावा ( ओळखपत्र / Photo Identity Card ) ( वाहन परवाना , पॅनकार्ड , राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र , पारपत्र , राष्ट्रीयकृत बँकेचे खातपुस्तक )
   23 . निवडयादी व प्रतिक्षायादी मध्ये निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीनुसार दुरुस्ती करणे किंवा रद्द करणे याचे सर्व आंधकारी अध्यक्ष , जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी जळगाव यांना राहतील .
   24 . उक्त सर्व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमुद सर्व निकषांची पुर्तता झाल्याशिवाय उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

मुळ कागदपत्र तपासणीच्या वेळी विहित अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही . कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्हता प्राप्त उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल .

6 टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. Source कडून अपडेट्स नाहीत, तरी लिस्ट लागल्यास लगेच साईट वर टाकू. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा https://youtu.be/8daLc6ea9sY

      हटवा
  2. सिंधुदूर्गची मिरीट लिस्ट कधी लागणार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने