Google ला आज 25 वर्षे पूर्ण झाली तरीही तुम्हाला Facts माहिती नाहीत ? || interesting facts


          आपल्याला कोणत्या हि गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपण Google कडून जाणून घेतो याच गुगल ला 23 वर्षे पूर्ण झाली . गुगल विषयी खूप सारे Google facts आहेत ते जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्यच वाटेल . गुगलने जणू आपले आयुष्य सोयीस्कर आणि सहज बनवून टाकले आहे त्यासाठी आपण त्यांचे गूगल चा शोध लावणाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात Interesting google facts

interesting facts of google
interesting facts of google


  
          GOOGLE हि अमेरिका स्थित मल्टिनॅशनल कंपनी आहे , जी  इंटरनेट सोबत अनेक गोष्टी  देत आहे.. GOOGLE ची सुरुवात STANFORD युनिव्हर्सिटी ला असणारे PHD चे विद्यार्थी SERGEY BRIN 
आणि LAWRENCE PAGE यांनी १९९८ कॅलिफोर्निया मध्ये केली.


        ➤  ४ सप्टेंबर १९९८ रोजी तिची खाजगी कंपनी म्हणून नोंद झाली. त्यानंतर १९ ऑगस्ट २००४ ला  Mountain View या ठिकाणी त्यांनी  स्थलांतर केलं जे कि सध्याच headquarter आहे.


         ➤  गूगलच्या बऱ्याच सेवा सुविधा आपण दररोज वापरतो  Google Map , Google Mail , Google Drive , Play  Store आणि हे दररोज लागणारे अँप्स त्याचबरोबर भरपूर गोष्टी आहेत


         ➤  सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीही सर्च करायचं असेल तर आपण Google वर टाकतो आणि आणि आपल्याला काही सेकंदात हवी ती माहिती मिळून जाते .


          ➤ सध्या Google चे CEO हे सुंदर पिचाई हे आहेत .


         ➤  गूगल कंपनीमध्ये आज जवळपास एक लाख लोक काम करतात .... चकित झालात ना? पण हे अगदी खरे आहे.
 
  
          ➤ १४ नोव्हेंबर २००६ ला गुगलने YouTube १.६५ बिलियन डॅालर्स ना विकत घेतले. तेव्हा गुगल कंपनी यशाच्या शिखरावर वाटचाल करु लागली होती .


          ➤ ३० एप्रिल २००९ ला गुगलने Android Operating System  दाखल केली जी आजतागायत लाखो, करोडो , अब्जों मोबाईल्समध्ये  पहावयास मिळते .
 
      
          ➤ गूगल बाबत आश्चर्यजनक गोष्ट पाहूया, त्यासाठी  तुम्हाला Google Maps ला भेट द्यावी लागेल व त्यानंतर Satellite view क्लिक करावे लागेल. तसेच शक्य तितके zoom कमी करा . आता तुम्ही पाहु शकता रियल टाइम सावलीसह पृथ्वीचे एक अद्भुत दृश्य दोन वेळा zoom केल्यावर तुम्ही ढग ही पाहु शकता. 
 

Google ला आज २१ वर्षे पूर्ण झाली तरीही तुम्हाला Facts माहिती नाहीत ? || interesting facts
Google ला आज 23 वर्षे पूर्ण झाली तरीही तुम्हाला Facts माहिती नाहीत ? || interesting facts


          ➤  California Grazing नावाच्या कंपनी कडुन गुगल शेळ्या भाड्याने देत होती , वरवर पाहता एक मेंढपाळ जवळपास २०० शेळ्या घेवुन त्यांच्या कॅम्पस मधे जात असे , आठवडाभर शेळ्या घास खायच्या तसेच त्यांच्यामुळे जमिनीला खत पुरवठा देखील व्हायचा.


          ➤ गूगल येण्यापूर्वी Yahoo सर्च इंजिन वापरल जात असे.


          ➤ Google ही खरं तर googol चुकीची स्पेलिंग आहे. ती एक गणितीय संज्ञा आहे त्याचा अर्थ असा होतो कि कोणत्याही अंकामागे १०० शून्य . Googol नावाचे Domain आधीच विकले गेले त्यामुळे Domain रजिस्टर करताना Google घ्यावे लागले.


          ➤ 1998 मध्ये, Google Doodle  सर्वप्रथम Google च्या  मुख्यपृष्ठावर दाखवण्यात आले .


          ➤ गुगलने 2005 मध्ये अँड्रॉइड कंपनी खरेदी केली. आज अँड्रॉइड फोनची लोकप्रियता इतकी जास्त आहे की सुमारे 80% स्मार्टफोन केवळ अँड्रॉइड सिस्टमचा वापर करतात. म्हणजेच दर 10 फोन पैकी 9 फोन Android आहेत.


          ➤ मंगळाचे दृश्य पाहायचे असल्यास इथे क्लिक करा  Google Mars .


          ➤ " I'm Feeling Lucky " वर क्लिक करून आपण आतापर्यंत गूगलचे सर्व लोगो पाहू शकता.


           ➤ गूगल एका सेकंदात सुमारे 1,30,900 रुपये कमवते.


            गुगल व त्यांची यशस्वी वाटचाल खुपच मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. आपल्याला यांमधून खुप काही शिकण्सायारखे आहे .


           मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण google विषयी माहिती आणि interesting google facts बाबत माहिती जाणून घेतली तर पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने