GrowHo (Grow Horizone opportunities Private limited) |ग्रोहो डिजिटल मार्केटिंग कंपनी 

सचिन बिऱ्हाडे



पुणे म्हणजेच विद्येचे माहेर घर तर आहेच पण त्या सोबत व्यवसायाचे पण आहे असच काही या दोन  तरुणांनी करून दाखवले पुणे सारख्या गजबजलेल्या शहरात,  सचिन बिऱ्हाडे आणि डॉ. गायत्री फडके या दोन स्मार्ट व्यावसायिकांनी 2023 मध्ये GrowHo (Grow Horizone opportunities Private limited) कंपनी सुरू केली. 


सचिन बिऱ्हाडे आणि डॉ. गायत्री फडके





व्यवसाय  सुरू करण्या अगोदर सचिन यांनी ५ वर्ष चित्रपट क्षेत्रात घालवले व पण हाताशी काहीही नाही आले मग तो जॉब च्या शोधात पुण्यात आला आणि बऱ्याच ठिकाणी मुलाखत दिल्यानंतरही शिक्षणाच्या मानाने त्याला नौकरी काही मिळत नव्हत्या पण शेवटी हाताला येईल ती नौकरी केली. काही काळ व्यवस्थित काम करत कालांतराने कंपनी बदलावी लागली व एका दुसऱ्या कंपनीत IT व डिजिटल क्षेत्राबद्दल नौकरीची ऑफर मिळाली व हळु - हळु त्या क्षेत्रात रस वाढू लागले.


पण पगार अगदीच कमी होता हाती काही मिळत नव्हते हाती काही रक्कम शिल्लक रहावी या साठी सचिन ऑफीस ते बसस्टॉप व बाकी ठिकाणीं पायी चालु  लागला व याच्याने काही पैसे शिल्लक तर राहत होते पण स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता काही  वेळा तर जॉब सोडून घरी निघून जावं असे मनात विचार येत होते. पण शेवटी घराचा विचार करत व जिद्द ठेवून IT व डिजिटल क्षेत्रातच करिअर करायचं या चिकाटीने  वेग- वेगळ्या कंपनीत चांगले काम व वरचे पद त्याला मिळत गेलेत याच काळात. सचिन ची भेट एके दिवशी कंपनीतील डॉ गायत्री यांच्याशी झाली आणि त्यांचाही प्रवास असाच काही खळतळ आहे हे त्याला कळालं रशिया ते इंडिया शिक्षण घेऊन , आई - वडील , फॅमिलीला सांभाळणे व जिद्दीने जॉब करणे हे डॉ गायत्री यांचे आयुष्य होते कुठे तरी सचिन व डॉ गायत्री यांचे विचार समतोल होते.


त्यांनाही IT व डिजिटल क्षेत्रात काहीतरी वेगळं करायच आहे हे सचिनला कळाले मग या दोघेही एकत्र आलेत आणि त्यांनी GrowHo ची सुरवात २०२२-२०२३ वर्षी केली दोघेही एक वेगळा विचार घेऊन लोकांना भेटत आपल्या Idea व प्लॅन सांगत गेले व  या idea सांगत असताना त्यांची ओळख ग्राफिक्स डिजाइन करणारा यश याच्याशी झाली व यश पवार ही मग त्यांच्या सोबत या प्रवासात जुळला आणि मग सगळे मिळून ते आयडिया लोकांना पटवू लागले डिजिटल मार्केटिंग काय असते , GrowHo ग्रोहो नक्की काय करणार , यात तुमचा बिझनेस कसा मोठा होईल हे लोकांना  कळत गेले व हळु - हळु   वेग - वेगळ्या क्षेत्रांतील व्यापारी , बिजनेसमन जुळत गेलेत 


GrowHo कमी वेळेत भारतातील लोकप्रिय कंपनी बनली कारण ग्रोहो डिजिटल सेवा प्रदान करण्यात चांगली असुन ग्राहकांचं मन जपत गेली. सचिन , गायत्री आणि यश यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांसाठी काहीतरी गोष्टी अधिक चांगल्या करन्यात ते यशस्वी झाले.


GrowHo हे खास आहे कारण ग्रोहो  नेहमी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत असत आणि लोकांच्या गरजेनुसार  वेबसाइट बनवणे, ऑनलाइन जाहिरात करणे आणि अनेक गोष्टींसह व्यवसायांना मदत करत असतात

आज ग्रोहो हजारो ते लाखो लोकांपर्यत पोचले आहेत.


GrowHo (Grow Horizone opportunities Private limited) |ग्रोहो

GrowHo ने अवघ्या काही महिन्यांत डिजिटल  क्षेत्रातील अनेक गोष्टी हलवून टाकल्या आणि अनेक ग्राहकांनाचा बिजनेस मोठा करुण दिला. त्यांच्या नवीन आणि स्मार्ट कल्पनांनी व्यवसायांना कठीण काळात सुद्धा ऑनलाइन जगात खरोखर चांगले काम करण्यास मदत झाली.


आज GrowHo  सोबत स्मार्ट आणि हुशार लोकांची एक उत्तम टीम आणि  त्यांचे पुणे आणि बंगळुरू येथे कार्यालये आहेत जिथे १०० पेक्षा जास्त व्यक्तींचा समूह आहे व ते अनेक महत्त्वाच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी एकत्र काम करतात GrowHo ऑनलाइन नवीन आणि रोमांचक गोष्टी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. सचिन आणि गायत्री भारतातील व्यवसाय वाढण्यास आणि चांगले काम करण्यास मदत करण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी भूतकाळात उत्तम काम केले आहे आणि नक्कीच GrowHo हे भारतातील नंबर One कंपनी बनेल व  भारतातील लोक डिजिटल जगात यशस्वी कसे होऊ शकतील याच्यासाठी ते काम करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने