पोलिस भरती लेखी परीक्षेबद्दल  संपूर्ण माहिती | 

Police Bharti written exam  information Spardha pariksha

Police Bharti written exam  information 

police bharti syllabus ( पोलीस भरती अभ्यासक्रम )
लेखी परीक्षा – 
आत्तापर्यंतच्या भरती प्रक्रियेत  शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० % गुण मिळवणारे उमेदवार १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरायचे मात्र यावर्षीपासून अर्थात 2019 पासून आधी लेखी परीक्षा नंतर शारीरिक क्षमता चाचणी असा अनुक्रम लागणार आहे.
अभ्यासक्रमात
     
1] अंकगणित
2] सामान्यज्ञान व चालू घडामोडी
3] बुद्धिमत्ता चाचणी व
4] मराठी व्याकरण
या अशा एकूण चार घटकांचा समावेश असतो
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे असून,  त्यात १०० प्रश्न दिलेले असतात.
एकूण  वेळ – ९० मिनिटांचा असतो.
आता सविस्तर पणे माहिती घेऊयात :-
लेखी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला सर्वप्रथम चारही विषयांपैकी जो सर्वात tough , अवघड अथवा कंटाळवाना विषय वाटतो अथवा जो तुम्ही आजपर्यंत कधीच केलेला नसेल असाच विषय सर्वात आधी अभ्यासासाठी घ्या!
या विषयाचा थोडा / सर्व अभ्यास करून झाल्यानंतर जो सर्वात intertsing अथवा सर्वात आवडीचा सर्वात सोप्पा विषय तुम्हाला वाटत असेल तो अभ्यासाला घ्यावा!
त्यांनंतर तिसरा विषय परत अवघड / कंटाळवाना  वाटणारा तर शेवटचा विषय हा आनंद देणारा आणि सोप्पा असा घ्यावा!
आता या  कधी न ऐकलेल्या न कोणी सांगितलेल्या न वाचलेल्या strategy ला वाचून तुमच्या मनात दोन प्रश्न आले असतील :-
१. ही पद्धत किती कालवधी साठी लागू करायची?
- जितका कालवधी साठी तुम्ही अभ्यास करणार असाल तितक्या काळावधी साठी हीच पद्धत वापरायची!
उदा. समजा
1] अंकगणित -  सोप्पा वाटणारा
2] सामान्यज्ञान व चालू घडामोडी - सर्वात सोप्पा वाटणारा
3] बुद्धिमत्ता चाचणी  - अवघड वाटणारा
4] मराठी व्याकरण - सर्वात अवघड  वाटणारा


असे जर एखाद्याला वाटत असेल आणि तो विध्यार्थी  एका दिवसात एकूण  8 तास अभ्यास करणार असेल तर  त्याने सर्वात पहिला विषय 2 तासांकरिता 'मराठी व्याकरण' अथवा त्याला जो विषय 'सर्वात अवघड' वाटतो तो घ्यायचा!
त्यानंतर, दुसरा विषय पुढील 2 तासांकरिता 'सोप्पा वाटणारा' असा अंकगणित  घ्यायचा!
तसेच तिसरा 'बुद्धिमत्ता' तर चौथा विषय शेवटच्या 2 तासांसाठी 'सामान्य ज्ञान' असा घ्यायचा!


२.  हे असं नेमकं का करायचं?  / असं केल्याने नेमक काय होईल?
- हे आम्ही अनेक विद्यार्थी मित्र मैत्रिणींचा अभ्यासाची पद्धत पाहून ही strategy सांगत आणि सुचवत देखील आहोत.. असं केल्याने सर्वात महत्त्वाचा फायदा असा होतो की , तुमचा अभ्यासातील Interest प्रचंड वाढतो.... आणि तुम्ही सलग 8 तास अशा पद्धतीने जरी अभ्यास करत बसलात तरी देखील शेवटच्या सेकंदापर्यंत तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येत नाही!

आता आपण एक एक विषय सविस्तरपणे अभ्यासू :- 
१) अंकगणित – 
लेखी परीक्षेत या घटकावर साधारणत: २० प्रश्न अपेक्षित असतात.
 अंकगणित अभ्यासताना पाढे, सूत्र, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाचे सूत्रे, व संख्याज्ञान हे अतिशय महत्त्वाचे ठरतात.….!
त्यांच्या आधारावर  आपण संख्यावरील क्रिया, दशांश अपूर्णाक व व्यवहारी अपूर्णाक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, लसावी व मसावी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा, सरासरी इत्यादी घटकांचा अभ्यास करु शकतो.
२) सामान्यज्ञान व चालू घडामोडी- 
या घटकावर साधारणत: ४० प्रश्न अपेक्षित आहेत.
यात भारत तसेच काही प्रमाणात जागतिक भूगोला संदर्भातील प्रश्नही विचारले जातात.
देशाच्या इतिहासासंबंधातील प्रश्नांची संख्या कमी असली तरीही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना व व्यक्ती, आंदोलने, चळवळी, अहवाल, वृत्तपत्रे, समाजसुधारक यांचा अभ्यास करणे जास्ती उपयोगी ठरते.
विज्ञान घटकात महत्त्वाचे शोध- संशोधक, अणुशक्ती आयोग व अणुऊर्जा केंद्रे, संशोधन संस्था, संरक्षण क्षमता, मानवी आहारातील घटक, मानवी श्वसन संस्था, नियोजित अवकाश कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र चाचण्या याकडे लक्ष पुरवावे.....यांसोबतच भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या तिन्ही विज्ञान शाखांचा अभ्यास करावा.
३) बुद्धिमत्ता चाचणी- 
बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या अभ्यासासाठी सराव महत्त्वाचा असतो.
परीक्षेत विचारले जाणारे अधिकतर  प्रश्न अंकमालिका, अक्षरमालिका, अक्षरमाला, सांकेतिक लिपी, सांकेतिक चिन्ह, भाषिक संकेत, सम आणि व्यस्त संबंध, वेळ, दिशा, रांगेतील क्रम, नातेसंबंध यावर बेतलेले असतात.
४) मराठी व्याकरण-   लेखी परीक्षेमध्ये सुमारे २० प्रश्न या घटकावर विचारले जातात.
यात नाम, सर्वनाम अशा मूलभूत घटकांपासून म्हणी,  वाक्प्रचार अशा सर्वच घटकांचा अभ्यास करणे अपेक्षित असते!
हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हमखास मिळवून देऊ शकतो!!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने