मस्तानीचे समाधिस्‍थळ mastani Samadhi
। mastani Samadhi 
। mastani Samadhi 
 पाबळ गाव हे पुण्यापासून जवळपास ५० की मी अंतरावर व छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ वढु ( बु ) पासून २१ का मी अंतरावर  आहे. १७४०मध्ये बाजीराव पेशवे यांच्या अकाली मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून किंवा विष प्राशन करून आत्महत्या केली असे सांगितले जाते. पाबळ येथे तिचे अंत्यसंस्कार  करुन समाधी बांधण्यात आली. मस्तानीने खाल्लेला तो हिरा मिळवण्यासाठी व समाधी मधे ठेवलेले काही दागिने मिळतील या हेतूने अज्ञात  चोरट्यांनी १९९७-१९९८ व  २००९ मध्ये समाधीचे खोदकाम केले. जवळपास ५ ते ६ फूट खोल समाधी उकरुन चोरट्यांनी हे निच कृत्य  केले. त्यांच्या हाती काही लागले नाही हे देव जाणे पण समाधीची नासधूस झाली हे खरे. 

या घटनेनंतर  पुरातत्त्व खात्याने समाधीचा जिर्णोद्धार  करून समाधी  उभी केली.   मस्तानी समाधीचे हे स्मारक ऐतिहासिक वास्तू असल्याने ही वास्तू संरक्षित करण्यासाठी शासनाने एक ठराव करून राजपत्रात हा निर्णय जाहीर केला होता . त्यानुसार पाबळ येथील मस्तानीची ऐतिहासिक समाधी संरक्षित स्मारक राहील व त्याची देखरेख पुरातत्त्व विभागाचे अधिन होईल असा निर्णय झाला होता असे समजते पण या निर्णयाच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. 

याच पाबळ गावात अतिशय पुरातन असे नागेश्वर शिव मंदिर आहे. मंदिराचे समोरच एक पुरातन बारव असून बारव मधे असनारे देवकोष्ठाची उन,वारा पाऊस आणि देखभाली अभावी झीज झाली आहे. हे मंदिर बहुतेक यादव काळातील असावे असे बांधकाम शैली वरुन वाटते. मंदिर परिसरात एक पुरातन असा मंदिर अवशेष सदृश खांब उभा आहे. या खांबा वरुन हे मंदिर पुर्वी खूपच भव्य असावे आणि नंतरच्या काळात या मंदिराची डागडुजी झाली असावी असे वाटते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने