कंधारचा भुईकोट किल्ला भटकंती  | kandharFort


दिंनाक ५/३/२०२३ रोजी कंधारचा भुईकोट किल्ला भटकंती

हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात जुन्या किल्ल्या पैकी एक.


Kandhar Fort
Kandhar Fortहा किल्ला मन्याड नदीच्या काठावर असून राष्ट्रकूट राजवंशाची राजधानी होती.   या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा कृष्ण ( तिसरा) याने केले असून या किल्ल्यावर राष्ट्रकूट, काकतिय , चालुक्य, यादव, बहामनी, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही , बरिदशाही, मुघल, आणि शेवटी हैदराबादचा निजाम यांनी ईथे हुकुमत गाजवली असी माहिती इतिहासातून मिळते. 
नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्यात अनेक बांधकामे केली ‌. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले . तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान  त्याच्यानंतर  खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी म्हणून नेमणूक केली .
 या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख  इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा एक शिलालेख  शाही बुरूजावर आहे तर  मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालचा शिलालेख आहे.
कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्या जवळच्या इमारती इब्राहीम आदिलशहाच्या काळात बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे.  औरंगजेबाच्या काळात मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे.

या किल्ल्याच्या भोवती पाण्याने भरलेला विशाल  खंदक आहे.  

किल्ल्यात अनेक वास्तू, अवशेष, सुंदर अशी भिंतीवर कोरलेली शिल्प, मंदिरे, लाल महल, शीत महल, अंबरखाना, दरबार महल, मछली दरवाजा, राणी महल, कसबत महल, बारदरी, विहिरी, तोफा, बुरुजे असून त्यांच्या बांधकाम शैलीत विविधता आहे. किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून  आज घडीला  दुर्लक्षीतपणामुळे भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यात  काटेरी झाडाचे जंगल झाले असून त्या मुळे किल्ला नीट पाहता येत नाही. किल्ल्याचे संवर्धन व जतन होणे आवशक आहे ‌.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने