चार भिंती शहीद स्मारक सातारा.| Char bhinti smarak satara

  अजिंक्यतारा किल्ल्याच्या बाजूला सातारा शहरात 'चारभिंती' हे एक हुतात्मा स्मारक आहे. सातारा शहरातील प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चार भिंती हे ऐतिहासिक वारसा लाभलेले   सुंदर असे हुतात्मा स्मारक आहे. 

char bhinti hutatma smarak
char bhinti hutatma smarak

हे ऐतिहासिक स्मारक  छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी १८३० साली या ठिकाणी बांधले . सातारा मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजया दशमी दसर्याच्या दिवशी  तेथून राजघराण्यातील स्त्रीयांना सातारा छत्रपतींची मिरवणूक पाहता यावी म्हणून या चार भिंती स्थानाची निर्मिती केली. पुर्वी या ठिकाणाला नजर महाल  म्हटले जायचे. 

नंतरच्या काळात या ठिकाणी १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्मारकाची उभारणी केली.या स्मारकात नावाप्रमाणे चारही बाजूंनी भिंती आहेत,मधोमध एक शहीद स्तंभ आहे ज्यावर हुतात्म्यांच्या आठवणींच्या कोनशीला बसवलेल्या आहेत. 

या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले.२००१ साली या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणहून सातारा शहराचे मनोहर दृश्य पहायला मिळते.

टीप - सध्या या पवित्र स्मारकाची तरुण पिढी कडून विटंबना केली जात आहे. किती तरी तरुन जोडपे येथे अपले हितगुज करत बसलेले असतात.असे दृश्य पाहून जेष्ठ नागरिकांचा जीव गुदमरून जातो आहे. सातारकरांना नम्र विनंती आहे की त्यांनी अशा जोडप्यांना या पवित्र स्मारक परिसरात बसण्यास मज्जाव करावा.

धन्यवाद

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने