पुण्यात ! स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या

महाराष्ट्र (पुणे) : आरोपी गर्लफ्रेंड असलेली ही विद्यार्थिनी चक्क  स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती.


pune mpsc girl murderd her boyfriend
pune mpsc girl murderd her boyfriendमहाराष्ट्र (पुणे) : प्रेमात माणसं जीव देतात हे तुम्ही ऐकलं असेलच पाहिलं सुद्धा असेल. मात्र पुण्यात एक वेगळीच घटना घडली आहे. चक्क आपल्याच प्रियकराची (Boyfriend) हत्या त्याच्याच प्रेयसीने (Girlfriend) केली आहे. याहून विशेष म्हणजे ती विद्यार्थिनी चक्क स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होती.  

        


     शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्यात सुद्धा स्पर्धा परीक्षांसाठी आणि अधिकारी घडविण्याचं केंद्र समजल्या जाणाऱ्या पुण्यात असं काही घडावं हे नक्कीच धक्कादायक आहे. पुण्यातील भेकराई नगर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 


        स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या  गर्लफ्रेंड असलेल्या तरुणीने रागाच्या भरातच सतत किरकोळ गोष्टींवरून होणाऱ्या वादात बॉयफ्रेंडचा गळा दाबून हत्या केली.


सोनल पुरुषोत्तम दाभाडे (वय 34 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं  तर रोहिणी रामदास युनाते असं आरोपी तरुणीचं नाव आहे.


   स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच दोघांची एकमेकांसोबत सुरुवातीला ओळख त्यानंतर  वाढलेल्या ओळखीतून मैत्री आणि शेवटी मैत्रीचं रुपांतर प्रेमातच झालं.


   त्यानंतर दोघे तरुण- तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.


सदरील दुर्दैवी घटना 29 ऑगस्टलाच  हिंद कॉलनी परिसरातील त्यांच्या राहत्या घरात घडली. 


      पोलीस तपास आणि शवविच्छेनाचा अहवाल समोर आल्यानंतरच तरुणीनं हत्या केली असल्याचा या घटनेत उलगडा झाला. तत्पुर्वी सुरुवातीला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.


   हत्येचा उलगडा झाल्यानंतर शेवटी बुधवारी संबंधित तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि शेवटी पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.29 ऑगस्टला किरकोळ कारणावरून सोनलसोबत रोहिणीचा सुरुवातीला शुल्लक असा वाद झाला. मात्र त्या वादात रागाच्या भरात रोहिणीनं शेवटी सोनलला ढकललं त्यात तो भिंतीवर आपटला. त्यानंतर मात्र तिने त्याच रागात त्याचा गळा दाबला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने