family man 2 webseries review marathi |फॅमिली मॅन 2 वेबसीरीज मराठी रिव्हिव्ह ।Movies  

family man 2 webseries review marathi
family man 2 webseries review marathiवेबसीरीज :family man  season  2  

IMDB रेटिंग :8.6/10

मिर्झापूर आणि सॅक्रेड गेम्स च्या दुसऱ्या भागात अनेक चाहत्यांच्या निराशा  हाती लागली असता फॅमिली मॅन (family man 2 )webseries  कडून चाहत्यांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या आणि सुदैवाने तेवढ्याच चांगल्या कथानकाद्वारे त्यांनी  अपेक्षा पूर्ण केल्या आहेत  .

फॅमिलीमॅनच्या पहिल्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी हा अधिकारी म्हणजेच मनोज वाजपेयी याची फॅमिली आणि गुप्तहेर संघटना यासाठी काम करताना होणारी कसरत सोबत पहिली पाकिस्तान च्या दहशदवादी संघटनानी देशावर वर मोठा हल्ला करायचा आखलेला बेत खूप बारीक गोष्टी चा विचार करत,वेगवेगळ्या शकली लढवत त्या पर्यंत पोहचतो .मुसा नावाचा दहशदवादी जो मोस्ट वॉन्टेड दहशदवादी असतो त्याने सगळ्यांना गुंगारा देत आपली ओळख लपवून ठेवतो .आणि नंतर तीथून सुटका करून दिल्लीवर हल्ला करायचा बेत आखतो .आणि एका केमिकल फॅक्टरी मधील केमिकल इंजिनिअर ला ब्लँकमेल करून भोपाळ सारखी घटना घडवून आणण्याची तयारी करतो आणि .पण मुसा ची आई सुद्धा दिल्लीत आहे हे त्याला कळते तेव्हा मिशन कॅन्सल करण्यासाठी जात असताना वाटेतच त्याचा सोबतच्या दहशदवाद्यांकडून त्याची हत्या होत्या आणि इकडे विषारी वायू पसरायला सुरवात होते आणि पहिला सिझन येथे संपतो .दुसऱ्या भागात काय होत याची उत्सुकता लोकांना होती .

दुसऱ्या भागात श्रीकांत तिवारी आपला जॉब सोडून IT कंपनी जॉईन करतो व आपल्या ,फॅमिली ला खुश ठेवण्याचा प्रयंत्न करतो .पण त्या कामात त्याच मन लागत नाही . गॅस लीक हल्ला त्यावेळी रोखलेला असतो पण त्यांत काही जणांचा मृत्यू झालेला असतो .दुसरीकडे एक श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी एक फुटीरवादी संघटना आहे. या संघटनेला भारतासह अनेक राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे.त्याच्या सदृश्य एक संघटना असते ज्याचा मोर्हक्या भास्करण आणि त्याचा सोबती  हा बाहेर देशात पळून गेलेला असतो .व त्याचा भाऊ तामिळनाडू मध्ये असतो भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान एक करार होणार असतो त्या बदल्यात श्रीलंकन पंतप्रधान ला प्रभाकरणचा भावाची मागणी करतात .त्या गोंधळात दहशदवाद्याकडून प्रभाकरणच्या भावाची हत्या होते आणि नाव भारतावर येते भावाचा हत्येचा बदला घेण्यासाठी प्रभाकरण व पाकिस्तान मधील एजन्ट मिळून प्लॅन बनवतात .ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांची सभे दरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणणार असतात .व याची जबाबदारी राजी म्हणजे आपली समंथा Samantha Akkineni हिच्याकडे जी कि  पायलट व त्या संघटनेची मुख्य सैनिक असते .एरव्ही गोड गोंडस दिसणारी अभिनेत्रीने हे पात्र खूप भारी निभावले आहे .मग हे मिशन साकारत असताना टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत फाईट्स आणि पोलिसांकडून अटक झाल्यास झालेली सुटका ते ऍक्शन सिन खूप जबरदस्त आहेत .

कुठल्याच अभिनेत्रीला ते जमले नसते पूर्ण सिरीज मध्ये तिची ऍक्टिंग भाव खाऊन जाते .मनोज वाजपेयी तर ग्रेट ऍक्टर आहेच त्यात काही गैर नाही त्याचे इमोशन ,डायलॉग डिलिव्हरी सुपर आहेच .त्याचबरॊबर श्रेया धन्वंतरी आणि सनी अहुजा यांचे पात्र सुद्धा जबरदस्त aspirant मध्ये निभावलेलं संदीप भय्या हे सनी अहुजा च पात्र लोक अजून विसरले नाहीत .शरीब हाश्मी यान केलेलं जेके हे पात्र खूप नॅच्युरल वाटत संपूर्ण सिरीज मध्ये इंटरटेन करत त्यानं आपला रोल खूप चांगल्या प्रकारे निभावला आहे .एकूण सर्वच कलाकाराचं काम आणि कथानक जुळून आले आहे .त्यामुळे हि वेबसीरीज प्रत्येकाच्या मस्ट वॉच लिस्ट मध्ये सामील झाली आहे .वयात आलेली मुलगी ,अगाव पोरगं ,सारखं मूड ऑफ असणारी बायको या कित्येक घराचा प्रतिनिधित्व करणारी कहाणी याद्वारे आपल्याला बघाया मिळते .प्रत्येकाने एकदा बघावी अशी सीरिज !!
©Dhiraj Bhosale

2 टिप्पण्या

  1. सोप्या शब्दात पूर्ण वेबसिरिजची मांडणी केलेली आहे.
    उतकृष्ट शब्धरचना आणि पात्रांच्या कलेला दिलेला न्याय दिसून येतो. असच लिहिलं जा. पुढील लेखाची वाट पाहत आहोत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने