'कोरोनाची दुसरी लाट पसरण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार' PM नरेंद्र मोदी हेच सुपर स्प्रेडर


PM नरेंद्र मोदी हेच सुपर स्प्रेडर


       भारतात जेव्हा जेव्हा मोठं संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा राज्यकर्ते असो वा विरोधक महत्वपूर्ण उपाययोजना करण्याऐवजी एकमेकांची ऊणीदुणी, कमतरता काढण्यातच धन्यता मानतात.  विरोधक राज्यकर्त्यांना नावं ठेवण्यात , त्यांना शहाणपणा शिकवण्यात,  बिनबुडाची आणि फक्त लोकांची मते मिळवण्यासाठी काहीही प्रश्न आणि बोचरी टीका करण्यात व्यस्त असतात तर सत्ताधारी अशा विरोधकांना फक्त चर्चेला वाव देणारी राजकीय खेळ मांडणारी आणि प्रत्येक शब्दांवर शब्द चढावीत अशीच उत्तरं देत बसतात.

      यात भरडली जाते ती फक्त आणि फक्त सामान्य जनता.  न वेळेवर अगदी मूलभूत अशा सुविधा मिळतात न नेमकं प्रश्न विचारायचे तरी कोणाला याचं उत्तर मिळतं. कोरोना सारख्या महामारी मध्ये सुद्धा वेगळं काही पाहायला मिळेल अशी आशा करणं सुद्धा सर्वसामान्यांना चुकीचं वाटावं इतकी कृतिशून्यता राजकीय व्यक्तिमत्त्वांनी दाखवली. 

     देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. रोज हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्य व्यवस्थेचे तर कंबरडेच मोडले आहे.
 
     यातून राजकीय वातावरण तापत ठेवण्यासाठी , भविष्यातील तसेच सध्याच्या निवडणूकांसाठी  केंद्र सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. 

      कोरोनाच्या या संकटकाळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत राहिले आणि कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.


     मात्र यापेक्षा देखील भयंकर अशी टीका, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आता केंद्र सरकारवर  करण्यास सुरूवात केली आहे. 

 ( IMA - INDIAN MEDICAL ASSOCIATION ) इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच कोरोनाची दुसरी लाट वाढण्यासाठी जबाबदार धरले आहे. 

      एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना डॉ. दहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे .

  ‘पंतप्रधान मोदी हेच सुपर स्प्रेडर असल्याचं त्यांनी या टीकेत म्हटलं आहे.

     देशात कोरोनाची दुसरी लाट पसरण्यास तेच जबाबदार आहेत.
  त्यांनी विधानसभेच्या निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये बेजबाबदारपणे प्रचार सभा घेतल्या आणि अशा संकटकाळात सुद्धा कुंभमेळा घेण्यास परवानगी दिली,
एकीकडे आरोग्य क्षेत्रातील सर्वजण लोकांना कोरोनाचे नियम समजवून सांगण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी सगळे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रचारसभा घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. 

    देशात अनेक जणांचा मृत्यू ऑक्सिजन तुटवड्यामुळे होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या परवानगी अभावी अनेक ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी रखडली असून देखील सरकारकडून त्याला फारसं महत्व देण्यात आलं नाही, अशी खंत दहिया यांनी यावेळी व्यक्त केली.


      दुसरीकडे प्रियांका गांधीनी 'कोरोना लढय़ात सर्व व्यवस्था, उपलब्ध स्रोतांच्या ताकदीनिशी झोकून काम केले नाहीत, तर तुम्हाला भावी पिढी माफ करणार नाही' अशी टीका योगी सरकार वर केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने