Parts of Speech |शब्दांच्या जाती ||marathi grammer       


      

                            नमस्कार मित्रांनो आपण आज मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरवात करत आहोत ,राज्यसेवा,तलाठी भरती पोलीस भरती या दृष्टिकोनातून आपण मराठी व्याकरण या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत तरी आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती चा अभ्यासक्रम पाहणार आहोत.

शब्दांच्या जाती ||marathi grammer
शब्दांच्या जाती ||marathi grammer 




शब्दांच्या जाती


एकूण शब्दांच्या जाती या आठ आहेत.

1) नाम:- खऱ्या किंवा वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.

उदा सागर ,टेबल ,झाड 


2) सर्वनाम:-नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात.

उदा क्र.१. किरण 10 वित शिकतो,तो खुप हुशार आहे. यामध्ये किरण या नामाऐवजी तो हा शब्द वापरला आहे.त्यामुळे यात तो हा शब्द सर्वनाम म्हणून ओळखला जातो.


3) विशेषण:-नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास ' विशेषण ' असे म्हणतात.

उदा:-सारिका दररोज शाळेत जाते,ती खूप हुशार मुलगी आहे.


यात सारिका या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा हुशार आहे. त्यामुळे हुशार हा शब्द विशेषण म्हणून ओळखला जातो.



4) क्रियापद :- वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दांमुळे वाक्यातील क्रिया दर्शविली
जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो , वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला 'क्रियापद असे' म्हणतात.

उदा:- गाय दूध देते.


5) क्रियाविशेषण :-  क्रिये विषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दास 'क्रियाविशेषण'असे
म्हणतात.

उदा - ती 'लगबगीने ' घरी पोहचली.


6) केवलप्रयोगी अव्यय :- मनाला एकाएकी होणारे हर्ष , तिरस्कार, आश्चर्य ई . विकार दर्शविण्यासाठी
 जे शब्द एकदमउच्चारले जातात , अशा अविकारी शब्दांना 'केवलप्रयोगी अव्यय' असे म्हणतात.

उदा- वाहवा , अहाहा , अरेरे , हायहाय ई .



7) शब्दयोगी अव्यय :- शब्दाला जोडून येणारे अव्यय म्हणजे 'शब्दयोगी अव्यय'होय .

उदा:- लिहण्यासाठी , कामामुळे ई.


8) उभयान्वयी अव्यय :- दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना
' उभयान्वयी ' अव्यय असे म्हणतात .

 मी लवकर येणार होतो पण उशीर झाला 


उदा :- त्यासाठी , शिवाय , आणि , व , परंतु,पण, ई . हे शब्द वापरतात .

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने