घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी बनवाल ।।Infotainment



घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी बनवाल ।।Infotainment
घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी बनवाल ।।Infotainment

             नमस्कार खास कोल्ड कॉफी (cold coffee)शौकीनसाठी आज आम्ही कोल्ड कॉफी कशी बनवतात याची रेसिपी घेऊन आलो आहोत तर खालील कृती बघा आणि घरच्या घरी कोल्ड कॉफी (cold coffee)बनवा .


साहित्य



● 1/2 लीटर थंड दूध
● 3 कॉफी  छोटे पाकिटस
● 1 टेबलस्पुन चॉकलेट सिरप 
● 1/ 2 कप चुर्ण साखर 
● डार्क  कम्प्पाउंंड  चॉकलेेेट



कृती :- 



● प्रथम मिक्सरच्या भांड्यात अर्ध्या लिटर थंड दूध घेऊन त्यात कॉफी पावडर , साखर टाकून, मिक्सरवर फिरवून घ्यावे. मग त्यात चॉकलेट सिरप आपल्या आवडीप्रमाणे मिक्स करावे. आणि परत 1 मिनिट मिक्सरला फिरवून घ्यावे.



● मग एका काचेच्या ग्लास मध्ये चॉकलेट सिरप घालवून घ्यावे व त्यात वरील मिश्रण ओतून घ्यावे. ग्लासवर वरून थोडीशी कॉफी भुरभुरावी. मस्त फेसाळ कोल्ड कॉफी तयार आहे. ही एक पद्धत आहे करायची.


● किंवा काचेच्या  ग्लास मध्ये कोल्ड कॉफी घेऊन त्यावर डार्क कम्प्पाउंंड चॉकलेट टाकून त्यामध्ये आवडत असेल तर ice cube टाकून मस्त कोल्ड कॉफी चा आस्वाद घ्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने