रिया चक्रवर्ती तर देहव्यापार करणाऱ्यांपेक्षाही.....…; बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री कडाडली


             मुंबई |      सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपुतने केलेल्या आत्महत्येने बॉलिवूड सोबतच प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनात सुद्धा खळबळ माजवली होती. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येचा तपास करताना दिवसेंदिवस अनेक नवनवीन खुलासे होऊ लागल्याने ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न आजही कायम आहेच आणि आत्ता मध्यंतरी सुशांत सिंग राजपुतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधातच तक्रार दाखल केल्याने आणि  ही केस सीबीआय कडे गेल्याने अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.         सुशांतच्या केसचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र बिहार पोलिस हा तपास त्यांच्याकडे सोपवा, अशी मागणी करत होते. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात राजकीय वादंग चांगलाच रंगला होता. 
   यादरम्यान मात्र बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहातगीने मुंबई पोलीस आणि रिया चक्रवर्तीवर एकदम जोरदारपणे निशाणा साधला आहे.


        जो व्यक्ती तुझ्यावर अवलंबून आहे, ज्या व्यक्तीचं तुझ्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी तू असं वागूच कसं शकतेस, असा सवाल पायलनं रियाला करत तिला शिक्षेची मागणी केली आहे.  


        या व्हिडीओतून तिने रियाबद्दल प्रचंड राग व्यक्त केला आहे.  रिया चक्रवर्तीची तुलना तिने चक्क देहव्यावापार करणाऱ्यांशी करून तिला भिकारीची उपमा दिली आहे.


        रिया पैसे तर घेत होती पण जाहीरपणे सुशांतसोबतच्या नात्याचा स्वीकार करत नव्हती असं म्हणत पायलने  रियाबाबतचा मोठा खुलासा केला. सुशांतच्या मानसिक तणावासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी औषधं आणि त्यांचा त्याच्यावर होणारा वाईट परिणाम या साऱ्या गोष्टी पायलनं या व्हिडीओतून मांडल्या आहेत.


पायल रोहतगी यांचा विडिओ :

     ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने