उद्धवजी ठाकरे यांना "संकटमोचन मुख्यमंत्री" म्हणून ओळखले जाईल : तृप्ती देसाई  || Marathi news


          देशभर पसरलेला कोरोना व्हायरस जस काही ठिकाणी वाढत असतानाचे चित्र दिसत आहे तर काही ठिकाणी रुग्ण बरे झाले आहेत यातच नैसर्गिक आपत्ती हि तोंड वर काढत आहेत. आता या सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळणे व त्यांना आटोक्यात आणन्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे कार्य बजावत आहेत. यातच भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फेसबुक मीडियावर लाइव्ह येऊन मु. उद्धवजी ठाकरे यांना "संकटमोचन मुख्यमंत्री " म्हणून ओळखले जाईल असे विधान केले.

उद्धवजी ठाकरे यांना "संकटमोचन मुख्यमंत्री" म्हणून ओळखले जाईल : तृप्ती देसाई

          तृप्ती देसाई लिहतात , निसर्ग चक्रीवादळाच्या दरम्यान, पावसाळ्यात काय काळजी घ्यायची ,काय करू नये ? लॉकडाऊन ,टोळधाड आणि निसर्ग चक्रीवादळ आपल्या राज्यावर आलेलं मोठं संकट. सतत पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या जवळ राहत असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आपल्या फेसबुक मीडियावरून लोकांना सूचित केले.


          देशात तीन महिने लोकडाऊनची स्तिथी असताना टोळधाड आणि कोकण किनारपट्टीला धडकलेले निसर्ग चक्रीवादळ एकंदरीत हा सर्व राज्यावर आलेला संकटाचा काळ आहे. अशातच आता लोकडाऊन ४ होऊन अनलॉक १ झाले व लोकांना बाहेर पडण्याची थोडा थोडी मुभा मिळत आहे. सर्वानी सरकारने दिलेले नियम पाळले आहेत. राज्यात आज २५०० पेशंट सापडले आहेत  व १५० च्या वर पेशंटचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर टोळधाड आली. आज आपण बघितलं असेल कि निसर्ग चक्री किनारपट्टीला धडकले.


          तृप्ती देसाई यांचे लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे जे काही निसर्ग चक्री वादळ आले त्याचा सामना कसा करायचा , काय उपाय योजना कराव्यात जेणेकरून मालमतेचे नुकसान होणार नाही या बाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनतर कोरोना विषाणू पसरला , चक्री वादळ आले , टोळधाड आली पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री परिस्तिथी चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच या सर्व संकटातून आपण बाहेर पडलो तर आवर्जून संकटमोचन म्हणून उद्धवजी ठाकरे याना ओळखले जाईल , लक्षात ठेवले जाईल असे त्या म्हणाल्या.

➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ

3)  Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख

        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने