कुलकर्णी बाई आणि मी || आयुष्याच्या गोष्टी


#Kulkarni Bai ani Me 

#Life Story


' हॕलो...अरे रिक्षावाला आहे का... ? नाही मी कविराज बोलतोय मॅडम... बोला काय झालयं आणि कोण पाहिजे तुम्हाला.. ? '

' अरे मला रिक्षा पाहिजे होती, स्टेशनवर जाण्यासाठी... '

' नाही मॅडम..मी रिक्षावाला नाहीय मी कविराज बोलतोय... '

' अच्छा सॉरी सॉरी, चुकून लागला वाटत ; पण तू काय करतो मग ? '

' मॅडम मी गार्डन मेंटेनंसची छोटीमोठी काम घेतो...आणि शिक्षण पण सुरूय... '

' अरे हो तो एक मुलगा यायचा तो तूच का ? पवन बोरसे म्हणून.. '

आता मात्र अंगावर शहाराच आला. मला आता त्या मॅडम कोण आहे हे कळलं. त्यांनी रिक्षावाला समजून त्यांच्या पूर्वीच्या गार्डनरला फोन लावला होता हे त्यांच्या आणि माझ्याही ध्यानात आलं होतं. 

    ' अहो कुलकर्णी मॅडम , मी पवन आहे. रिक्षावाला नाहीय. तुम्ही कशा आहात ? काही काम निघालं तर हक्कानं कळवा बरं. पैशाचं बघू नंतर. बगिचा कसाय आता ? '

' अरे हो.. या डायरीत एकदा तुझा नंबर घेतलेला पण मलाच थोडीशी गफलत झाली. बाकी सगळं ठिक आहे. बागही मस्तय पण तुझा हातच नाही लागला किती दिवसापासून बिचारी सारखी आठवण काढते रे. मी आता मुंबईला जातेय. रिटर्न इकडे आले की कळवते तुला. आता नंबर सेव करते बरं का. तूही करून ठेव माझा नंबर सेव. आता हायपाय बोंब मारता एवढंच बाकी चांगलय. '

'मॅडम, काळजी घ्या..आणि मी पाठवतो तुमच्या घरी रिक्षा...काळजी नसावी....चला ठेवतो.. '

कुलकर्णीबाई आणि मी || आयुष्याच्या गोष्टी
कुलकर्णीबाई आणि मी || आयुष्याच्या गोष्टी

          क्षणभर आभाळाकडं बघितलं अन दोन्ही हात डोळ्यांना लावले. डोळ्यांना मला रडतं करायचं होतं ना. आसवं तशी ऐकत पण नाही लगेच घळाघळा ओघळायला सुरूवात करतात. गहिवरून आलं अन खूप रडू लागलो अगदी सीमेपार. स्वतःला अन काळजाला मोकळं केलं. पूर्वीच्या कुलकर्णी मॅडमचा फोन घेऊन सगळं काही ताजं झालं. बाई तशा साहित्यप्रिय. मुलं मुंबईत मोठ्या नोकरीला त्यामुळं बाई तिकडंच रहायच्या कधीतरी महिना दोन महिन्यातून नाशकातल्या घरी यायच्या हा पण दूर राहत असतानाही त्या बागेला फार जपायच्या. तेव्हा मी बाईंकडं तीनशे रूपये पगारावर काम करायचो. महिन्यातले ८ दिवस काम करायचं म्हणजे आठवड्यातून दोन दिवस.


          मी एकदाचा बागेत रमलो की बाई नुसत्या बघत रहायच्या माझ्या हातातील कात्रीकडे. कारण मी कैची अगदी सफाईदारपणे चालवायचो आणि कितीही वाकडं असलेलं झाडं आकार घ्यायचं. बाई घरी आल्या की माझी मजा असायची. कारण त्यांच्या हातचा चहा प्यायला मिळायचा. अद्रक आणि चाय मसाला घातलेला. मॅडमच्या बंगल्यावर एक बाईसुद्धा कामाला होती. मॅडम असो नसो ती रोज घराची साफसफाई करायची. तिच्याकडे घराची जबाबदारी तर माझ्याकडे बागेची. मॅडम तशा वाचनप्रिय. पुस्तकांची त्यांना भलतीच आवड होती आणि बोलण तर पीएचडीवाल्यालाही लाजवेल असं.


          घरात कधी गोडधोड केलं तर मॅडम मला आवर्जून खायला द्यायच्या. मॅडम अगदी मुलासारखं जपायच्या. कधी कॉलेजला, पुस्तकांना गरज पडली तर तेही करायच्या. कधी बागेत काम करताना काटा वगैरे टोचला किंवा खरचटलं तर त्या लगेच म्हणायच्या अरे बघून काम कर आणि निवांत होऊ दे...कधीकधी मॅडम पन्नास शंभराची बक्षिसी देऊन मुंबईला जायच्या. मॅडमचे पती हयात नसल्याने त्यांची उणीव त्यांना कायम भासायची. तिथली कामवाली बाईसुद्धा माझी काळजी घ्यायची. माझ्या कामात मदत करायची. आमच्या मस्त गप्पा रंगायच्या. ती तिच्या संसारगाथेतील काही घटना मला सांगायची. पोरांसाठी किती केलं ते सांगायची. पन्नाशीतही ती कामवाली बाई पटापटा कामं करायची.

कुलकर्णीबाई आणि मी || आयुष्याच्या गोष्टी
कुलकर्णीबाई आणि मी || आयुष्याच्या गोष्टी

         काही काळाने जरा चांगलं काम मिळालं आणि शिक्षणही होतं त्यामुळं वेळ कमी पडू लागला आणि नाईलाजास्तव ते काम मला इच्छा नसूनही सोडावं लागलं. कुलकर्णी बाईंविषयी कितीही बोललं तरीही कमीच. त्यांनी मला चुकून रिक्षावाला समजून लावलेला फोन मला आणि त्यांना भूतकाळात घेऊन गेला.


        असं सगळं आठवत असताना डोळ्यांचा पूर थांबत नव्हता. नशिबानं सतत दगा दिला आणि आजही देतच असत पण मी ना कधी घाबरलो ना कधी हरलो; मी फक्त आणि फक्त लढलो आणि लढत राहीन...झोपताना एक विचार मात्र करतो कि इतकं मोठं व्हायचं की वंचित आणि शोषित यांचा आधार व्हायची पात्रता स्वतःकडे असायला हवी....बाकी मी असाच आहे या धड्यातून...
लेखन : ✍  © पवन बोरस्ते
            ◾ ७०५८५८९७६७, 
            ◾ भगूर, जि.ता.नाशिक


FB :  पवन बोरस्ते  Or 
➤ https://www.facebook.com/pavan.boraste.90


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने