घरच्या घरी बनवा थंडगार Mint Mojito || Marathi special


          कोरोना विषाणूचे संकट काही कमी होताना दिसत नाही तसेच लोकडाऊन सुद्धा वाढवण्यात येत आहे. घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे उन्हाळ्यात घरी बसावे लागत आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे रक रकते ऊन यामुळे बर्फाच्या लादीवर झोपून जाण्याची इच्छा होते. बाहेर जाऊन थंड पेये पिणे देखील जमत नाही , म्हणून खासमराठी खास तुमच्यासाठी थंडगार शीतपेय घेऊन आलीये ते म्हणजे मिंट मोजीतो . हे मिंट मोजीतो घरच्या घरी कसे बनवायचे हे आपण या लेखातून शिकणार आहेत , चला तर मग Mint Mojito कसे बनवतात ते पाहू.


साहित्य :


➤ लिंबू

➤ पुदिन्याची पाने

➤ सोडा ( प्लेन सोडा वापरु शकता.)

➤ काळे मिठ

➤ पिठीसाखर

➤ बर्फ

घरच्या घरी बनवा थंडगार Mint Mojito || Marathi special
घरच्या घरी बनवा थंडगार Mint Mojito || Marathi special



कृती :


१) अर्धा वाटी / कप  पुदिन्याची पाने धुवून घ्यावीत . त्यात चिमुटभर काळे मिठ टाकावे .


२) मिक्सर मधुन काढुन घ्यावे व ही पेस्ट एक वाटी मधे काढुन घ्या आणि गाळुन घ्या.


३) एक ग्लास मधे थोडे पाणी घ्या त्यात दोन चमचे साखर घाला .


४) एक ते दिड चमचा पेस्ट घाला .


५) छोट्या आकाराचे अर्धे लिंबू पिळुन त्याचा रस काढावा .


६) साखर विरघळली की सोडा टाका आणी बर्फाचे तुकडे घाला.


७) लिंबाचे काप आणि पुदिन्याची पाने लावुन सजवू शकता.


८) तुमच्या गरजेनुसार साखर कमी जास्त करु शकता.


          अगदी कमी साहित्य आणि थोड्याच वेळात तयार होणारे हे पेय उन्हाळ्यात जणू अमृतच बनून जाते . तुम्हाला मिंट मोजितो कसे बनवायचे हे माहीतच झाले असेल , ते घरी नक्की करून पहा व कसे वाटले ते आम्हाला  ही comment च्या माध्यमातून नक्की कळवा ! सोबतच ही सर्व माहिती आपल्या प्रत्येक मैत्रिणी सोबत share करायला विसरू नका ! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने