लोकप्रिय CarryMinati आहे तरी कोण ? || YouTube vs Tik Tok || biography


          एक भारतीय तरुण मुलांच्या वयाचा लोकांमध्ये लोकप्रिय असलेली व्यक्ती , हास्य - मनोरंजन करण्यात तरबेज असणारी व्यक्ती , गेम तर असा खेळतो जणू एखादा एक्स्पर्ट रोबोटच , YouTube वर प्रसिद्ध , भारतातील क्रमांक १ चा असलेला लोकप्रिय यूट्यूबर  , त्याची CarryMinati म्हणून ओळख आहे. खरतर त्याचे खरे नाव अजय नागर ( Ajay nagar ) आहे. वय वर्षे अवघे २०.  लाखो रुपये कमवतो तो . प्रश्न पडतो कि हि व्यक्ती इतकी लोकप्रिय का आहे ? चला तर मग जाणून घेऊयात , Who is Carry Minati ? YouTube vs Tik Tok : The End काय आहे प्रकरण ?

लोकप्रिय CarryMinati आहे तरी कोण ? || YouTube vs Tik Tok || biography
लोकप्रिय CarryMinati आहे तरी कोण ? || YouTube vs Tik Tok || biography

          १२ जून १९९९ साली अजय नागर ( कॅरी मिनाती ) चा जन्म भारताच्या फरिदाबाद मध्ये झाला. हे शहर भारताची राजधानी दिल्लीच्या जवळच आहे. अजय नागर उर्फ कॅरी मिनाती याने २०१६ पर्यंत शिक्षण घेतले (स्कुल) जे पुढे जाऊन त्याने बंद केले ते फक्त आणि फक्त आपले युट्युब करियर पुढे नेण्यासाठी.
अर्थशास्त्राच्या परीक्षे विषयी निश्चित नसल्यामुळे त्यांनी बारावी बोर्ड परीक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने बर्याच काळानंतर आपले शिक्षण पूर्ण केले.


          अजय नागर वर सांगितल्याप्रमाणे आपल्या लोकप्रिय नाम कैरीमिनाटी, किंवा कैरी या नावाने ओळखले जातात , ते यूट्यूब वर लोकांच्या बाबतीत हास्यकल्लोळ उडवणारी विडिओ ( Roasting video ) करण्यात तरबेज आहेत. तसेच यूट्यूबवर ऑनलाइन ( Live ) गेमिंग , व्यंग्यात्मक पैरोडी आणि कॉमेडी विडिओ बनवत असतात जे लोकांना खूपच आवडतात त्यामुळे लोक त्याना पसंत करतात.


          अजय नागर यांनी वयाच्या १० व्या वर्षापासूनच आपल्या युट्युब करियर ची सुरुवात केली आणि त्यावर ते सक्रिय देखील होते विडिओ बनवून पोस्ट करत राहायचे . सुरुवातीचे जे Youtube Channel होते त्यावर अजय हे सनी देओल यांची मिमिक्री चे विडिओ टाकायचे तसेच विडिओ गेम चे रेकॉर्डिंग विडिओ पोस्ट करत असायचे. कैरीमिनटी नावाचे युट्युब वरील चॅनेल हे त्यांचे मुख्य चॅनेल आहे . जे २०१४ साला पासून त्यावर सक्रिय आहेत. तर २०१७ सालच्या सुरुवातीस अजय नागर ने  CarryIsLive नावाचे एक नवीन चॅनेल सुरु केले. ज्यावर अजय ( Live - stream ) थेट प्रक्षेपण गेम खेळतात. 

लोकप्रिय CarryMinati आहे तरी कोण ? || YouTube vs Tik Tok || biography
अजय नागर यांनी सिल्वर आणि गोल्ड यूट्यूब प्ले बटन यशस्वीरित्या मिळवले.

          अनिरुद्ध नागपाल द्वारा अजय नागर यांना मदत केली जाते , जे त्यांचे व्यवसाय व्यवस्थापकाचे काम बजावतात. अजय त्यांच्या टीम सदस्यांसोबत आपल्या फरिदाबाद मध्ये असलेल्या घरातील एका हिस्याचा उपयोग स्टूडियोच्या रूपात विडिओ बनविण्यासाठी करतात. फेब्रुवारी २०१९ पर्यंत अजय नागर यांनी सिल्वर आणि गोल्ड यूट्यूब प्ले बटन यशस्वीरित्या मिळवले.


          २०१९ साली यूट्यूबर प्यूडीपाई याच्या विरुद्ध  " बाय प्यूडीपाई " या नावाचे विडिओ गाणे आपल्या युट्युब चॅनेल वर प्रदर्शित केले . जे प्यूडीपाई विरुद्ध टी-सीरीज यांच्यातील स्पर्धेविषयी होते . हे विडिओ गाणे जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा त्या गाण्याला २४ तासात जवळ जवळ ५० लाख लोकांनी ते पाहिले. तसेच ह्या स्पर्धे दरम्यान प्यूडीपाई ला खूप साऱ्या शिव्यांचा भडीमार पडला.


          टाइम पत्रिका द्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 मध्ये अजय नागर यांची १० व्या स्थानावर निवड झाली . हि तीच १० लोकांची यादी आहे ज्यांनी इनोवेटिव करियर चे निर्माण केले. याशिवाय अजय नागर यांनी भारतात उदभवणाऱ्या आपत्ती विरोधात मोठी देणगी दिल्याचे आढळते. हि मदत करण्याआधी ते CarryIsLive या  YouTube channel वरून Live गेम खेळतात व त्यातून जे पैसे मिळतात ते देणगी देऊन टाकतात.

लोकप्रिय CarryMinati आहे तरी कोण ? || YouTube vs Tik Tok || biography
लोकप्रिय CarryMinati आहे तरी कोण ? || YouTube vs Tik Tok || biography


YouTube vs Tik Tok :


          कोरोना विषाणू लोकडाऊन परस्थिती दरम्यान गाजलेला एक विषय म्हणजे Tik tok vs YouTube . या विषयी सांगायचे झाले तर आमिर सिद्दकी नावाच्या युवकाने युटूबर्सना खालच्या पातळीवरील संबोधले तसेच त्यांच्यावर अनेक आरोप लगावले म्हणजेच त्याचे म्हणणे होते Tik tok मुळेच अनेक युटूबर्सना पैशे कमवता येतात. त्यानंतर कॅरी मिनाटी ने त्याला उत्तर दिले. तो विडिओ इतका गाजला कि तो आता पर्यंतचा सगळ्यात जास्त लाइक असलेला विडिओ बनला . हा एक रेकॉर्डच म्हणता येईल.


          युट्युब ने काही काळानंतर तो विडिओ युट्युब वरून काढून टाकला. त्यानंतर वातावरण खूपच तापले. टिक टोक हे चायनीज असल्याने व यातील कन्टेन्ट खूपच वाईट असल्या कारणाने लोकांनी त्याची रेटिंग ४+ वरून १.२ वर आणून ठेवली. खूप मोठ्या प्रमाणात टिक टोक लोकांनी त्यांच्या मोबाईल मधून काढून टाकले. #BanTikTokInIndia हा ट्रेंड Twitter वर बहुचर्चित झाला. भारतीय लोकांनी टिक टोक वर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले.  विशेष म्हणजे सर्व युटूबर्सनी कॅरीला मिनाटीला सपोर्ट केले. अशा या लोकप्रिय कॅरी ने अवघ्या २० व्या वर्षीच खूप नाव कमावले.   



          मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने