“मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार, राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक ” - मायावती || Marathi news


          भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला पाहून देशातील अनेक उद्योग धंदे ठप्प आहेत त्यामुळे ज्यांची हलाखीची परिस्तिथी आहे व जे मजूर आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत हे मजूर खूपच घाबरलेले दिसताहेत. त्यांची विचारपूस केली असता असे आढळले कि त्यांना त्यांच्या गावी जायचे आहे. अनेक मजूर पायी चालले आहेत त्यांच्याकडे कसलेच साधन नाही.


          १६ मे रोजी Rahul gandhi यांनी काही मजुरांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या व त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भातल्या व्हिडीओवर मायावतींनी टीका केली आहे. Rahul  gandhi चा व्हिडीओ म्हणजे एक नाटक आहे, सध्या देशात मजुरांची जी काही अवस्था , हाल सुरु आहेत त्याला सर्वस्वी कारणीभूत Congressच आहे अशी टीका Bsp च्या Mayavati यांनी केली. राहुल गांधी यांनी मजुरांच्या ज्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवरच आता मायावतींनी विधान केले.

“मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार आहे , राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक ” - मायावती || Marathi news
“मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार आहे , राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक ” - मायावती || Marathi news

बसपाच्या मायावती म्हणाल्या 


          ”  सध्या देशातल्या करोडो स्थलांतरित मजुरांची जी अवस्था आहे, जी दुर्दशा झालेली दिसत आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात व्यापार बंद असल्याने , स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक हाल सहन करावे लागत आहेत. या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त काँग्रेसचं जबाबदार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या कालावधीसाठी देशात काँग्रेसची सत्ता होती. एवढ्या मोठ्या शासनकाळात जर काँग्रेसने या मजुरांच्या अन्न, वस्त्र व निवारा या व्यवस्था पुरवल्या असत्या तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती ”  या प्रकारचं ट्विट मायावतींनी ट्विटर वर केले.


          प्रदर्शित केलेल्या विडिओ द्वारे श्रमिकांसाठी खूप आत्मीयता आहे असं काँग्रेस नेते दाखवत आहेत. मात्र काँग्रेसने हे सांगायला विसरायला नको होत की लोकांची भेट घेतली तेव्हा त्यांना नेमकी किती आणि कशी मदत केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांसोबत चर्चा करतानाचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र हा व्हिडीओ म्हणजे एक नाटक आहे. असंही मायावती यांनी सुनावलं आहे. परंतु ज्या मजुरांना आत्ता घरापर्यंत पोहचण्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्यांना बसपाच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी त्यांना सर्व गोष्टींनी सहकार्य करावं असं आवाहन मायावती यांनी केले .


          तसेच, जर भाजपाची केंद्र सरकार व राज्य सरकारे कॉंग्रेसच्या पाऊलावर पाऊल न ठेवता , जर त्यांनी अनेक गाव / शहरांमध्ये रोजगाराची योग्य व्यवस्था करुन या बेघर कामगारांना आत्मनिर्भर बनवण्याचे धोरण अंमलात आणले तर पुढे त्या मजुरांना कदाचित अशा संकटांचा सामना करावा लागणार नाही. पुढे मायावती म्हणाल्या कि बसपाच्या लोकांना पुन्हा आवाहन करत आहे कि जे प्रवासी मजूर आहेत ते त्यांच्या मूळ गावी परतले असून त्यांना गावाच्या बाहेरच वेगवेगळे ठवण्यात आले आहे त्यांना सरकारची मदत पोहचत नाही आहे अश्यांची माणुसकी म्हणून मदतीचे प्रयत्न करा . 
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

हे आर्टिकल तुमच्यासाठी उपयुक्त आहे - नवीन मोबाइल घेताय मग या ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात.           ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने