यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .   

यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .
यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .

       ज्या रोपाला आपण वेळेवर पाणी, खत घालत नसतोत त्या रोपाला लवकर फळे लागतील अशी अपेक्षा तरी कशी करावी ??

      सर्व दुःखांचे मुळ या अपेक्षाच असतात...मात्र खरच दुःख कधी व्हायला हवं?? जेव्हा तुम्ही एखाद्या रोपट्याची खूप मनाभावातून काळजी घेतली असाल - त्याला योग्य वेळी हवं ते ते देत गेला असाल आणि तरी त्याला फळ लागलंच नसेल अशावेळी दुःख होत असेल तर समजू शकतो !

    मात्र, आपण उठून ज्या गोष्टी खरच ते रोप वाढविण्यासाठी गरजेच्या आहेत त्या करणे सोडून फक्त बघत बसलोय आणि आपल्याला फळ का भेटत नाही....असं म्हणत दुःख करत बसलो तर कोणाला तरी पटेल का हे ??

    मात्र कळत नकळतपणे अनेक ठिकाणी मी हे स्वतः पाहिलं आहे अनुभवलं सुद्धा आहे...

     अनेकांना चांगल्या बॉडी ची काही जणांना चांगल्या ऑडीची गरज वाटते..... गाडी बॉडी अथवा एखादी सुंदर ललना आपल्या प्रेमात पडावी असं सुद्धा .... एक न अनेक कुठेही जा कोणतेही क्षेत्र घ्या ..... प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात जे हवं ते मिळवायच असेल तर हाच नियम लागू पडेल !

यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .
यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .

    हवं ते मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं..... कुठे तुमचा वेळ, तर कधी थोडीशी मेहनत....कधी काहीतरी नवीन शिकावं लागतं तर कधी प्रचंड घाम गाळावा लागतो..... !

      देता का तुम्ही हे ? ज्यांचं यश पाहून तुमची जळते ना त्यांनी त्या यशाची किंमत आधी मोजलेली असते! काही जणांनी Hard Work करून काही जणांनी Smart Work करून.... ती लोकं त्यांच्या रोपाला झाड बनवताना जे जे लागतं ते ते देत आलेले असतातच .... म्हणूनच आणि फक्त म्हणूनच त्यांचं फळ आज फक्त त्यांनाच नव्हे तर तुम्हाला ही दिसतं!!

     मग अशा मेहनती हुशार यशस्वी लोकांवर जळून ,  तो धूर काढत आणि सगळीकडे पसरवत बसण्याऐवजी त्यांनी ती मेहनत कशी घेतली असेल ते तुम्ही शिकायला हवं... मग तुमच्या रोपाला काय काय हवं ते ते पाहायला हवं....

     चांगली बॉडी पाहिजे मग दादा सकाळी लवकर उठ व्यायाम कर चांगला आहार घे मनात समाधान ठेव आणि लवकर झोप का नाही होणार तुझी बॉडी ??

यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .
यशाचे रहस्य ( Secret of Success )  जाणून घ्यायचेय मग हे नक्कीच वाचायला हवं । वैचारिक ।। खासमराठी .

     चांगली ऑडी हवीय मग दादा उठ तुझी income वाढव, वायफळ खर्चे कमी कर, एका पगारी मध्ये भागत नाही मग फावल्या वेळात अनेक उद्योग कर.... जे येतं त्यांचे क्लास घे..... मोठी गोष्ट हवी असेल तर मोठाच विचार करावा लागेल...वेळ पण मोठाच लागेल पण बघ तू अशी लागणारी प्रत्येक गोष्ट करत राहशील तर एक दिवस जे हवं असेल ते नक्की मिळेल.... हो एकदम नक्की !! कारण या जगात काहीच अशक्य नाहीये !!

      योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात योग्य प्रमाणे करशील तर जे हवं ते सर्व मिळेल..... आणि हो हेच यशाचं रहस्य आहे . !! 
   
~S.J.

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने