खोटे बोलल्यामुळे डोळ्यांना होतो हा आजार? | आरोग्यम || खासमराठी

खोटे बोलल्यामुळे डोळ्यांना होतो हा आजार? | आरोग्यम || खासमराठी
खोटे बोलल्यामुळे डोळ्यांना होतो हा आजार? | आरोग्यम || खासमराठी

       जुन्या काळात म्हणजे आपल्या आज्जी आजोबांच्या काळात एक आख्यायिका अशी होती की जेव्हा पण पापणीच्या काठावर फोड यायचा तेव्हा तो व्यक्ती खोटं बोलल्यामुळेच तो फोड यायचा!!

       अजूनही अनेक खेड्यांमध्ये 'रांजणवाडी' अथवा कुठे कुठे 'रांजणवेडी'  नावाने ओळखला जाणारा रोग खोटं बोलल्यामुळेच होतो अशी भ्रामक कल्पना आहे!!


     चला तर मग आरोग्यासाठी असलेल्या खासमराठीच्या या खास भागात आज रांजणवाडी बद्दल अधिक सविस्तर माहिती आणि त्यावर असणारे उपाय जाणून घेऊ !!

उपाय :


१) पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठकिंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो.२) पू गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. पण पापणी दाबून पू काढू नये. कारण त्यामुळे कधीकधी पू उलट रक्तामधून मेंदूत जाण्याची शक्यता असते.


खोटे बोलल्यामुळे डोळ्यांना होतो हा आजार? | आरोग्यम || खासमराठी
खोटे बोलल्यामुळे डोळ्यांना होतो हा आजार? | आरोग्यम || खासमराठी३) कपडयाचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून 5-6 वेळा  शेकवावे. याने एक-दोन दिवसांत रांजणवाडी जागच्या जागी जिरण्याची शक्यता असते.४) दुसरा एक उपाय म्हणजे सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ-संध्याकाळ लावावा.


५) एक उपाय असाही आहे की रांजणवाडी मोठी होऊन पू भरला असल्यास पापणीचा तेवढाच केस नखात अथवा चिमटयाने धरून उपसून काढल्यास कणभर पू बाहेर पडतो. त्यामुळे मात्र तिथे जखम निर्माण होते.६) दोन-तीन दिवसांत ती  जखम नंतर भरून येते आणि रांजणवाडी नीट होते, मात्र हा उपाय अयोग्य पद्धतीने केल्यास डोळ्यांना ईजा देखील होऊ शकते.

पुन्हा पुन्हा रांजणवाडी होण्यामागे चष्म्याचा क्रमांक वाढल्याची शक्यताही असू शकते.
मात्र, वरील आजीबाईंच्या बटव्यातील उपाय करून सुद्धा फरक न पडल्यास मात्र नेत्र तज्ञांची भेट अवश्य  घ्यावी.


 ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने