बलात्काऱ्यांना आता मोजून 21 दिवसांतच फाशी ||  Disha Act || Marathi news


          Andhra pradesh  सरकारने अखेर ' Disha Act ' पास केला आहे. याअंतर्गत बलात्काराच्या घटनेनंतर आता 21 दिवसात  दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. कायद्याला नाव देखील पीडित तरुणीच्या नावावरच देण्यात आले आहे, यातून या प्रकरणाला आंध्र प्रदेश सरकारने किती गांभीर्याने घेतले आहे याची कल्पना येते !

बलात्काऱ्यांना आता मोजून 21 दिवसांतच फाशी ||  Disha Act || Marathi news
बलात्काऱ्यांना आता मोजून 21 दिवसांतच फाशी ||  Disha Act || Marathi news
             
          कालच झालेल्या आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक अखेर मंजूर करण्यात आले. त्यामध्ये  एफआयआर दाखल झाल्यानंतर 21 दिवसाच्या आतच खटल्याच्या सुनावणी सोबतच  दोषींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आज आंध्र प्रदेश राज्य सरकार विधानसभेत हे विधेयक सादर करणार आहे. या विधेयकात भारतीय दंड संहीता 354 मध्ये संशोधनात्मक बदल करण्यात आले असून नवीन कलम 354 (ई) तयार करण्यात आले आहे . 


         संपूर्ण भारतातील कोणत्याच राज्यात बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. म्हणूनच आंध्र प्रदेश दिशा कायदा विधेयक पास झाल्यानंतर आंध्र प्रदेश हे बलात्काऱ्यांना फाशी देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे .

बलात्काऱ्यांना आता मोजून 21 दिवसांतच फाशी | दिशा कायदा || खासमराठी
बलात्काऱ्यांना आता मोजून 21 दिवसांतच फाशी | दिशा कायदा || खासमराठी


               21 दिवसात मिळणार दोषींना शिक्षा


          आंध्र प्रदेश दिशा अधिनियमांतर्गत बलात्कारासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांना अशा  प्रकरणांचा तपास अहवाल सात दिवसांच्या आत पूर्ण करून 14 दिवसांत न्यायालयाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे 21 दिवसांच्या आत दोषींना फाशीची शिक्षा मिळेल, अशी तरतूद  दिशा कायदा विधेयकात करण्यात आली आहे .


           खरेतर फक्त आंध्रप्रदेश नव्हे अथवा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर सध्या संपूर्ण भारत देशामध्ये अशा कायद्यांची गरज आहे ! 


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !



📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥ 
   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने