श्री नरेंद्र दामोदरदास मोदी

यांचा जन्म 17 September 1950  रोजी वडनगर, मेहसाणा जिल्ह्यात  तेव्हाचे मुंबई राज्य आणि अर्थातच सध्याच्या गुजरातमध्ये झाला!

     त्यांच्या वडिलांचे नाव  दामोदरदास मूलचंद मोदी आणि आईचे नाव हिराबेन मोदी आहे .  या जोडप्याला सहा मुले आहेत, सहापैकी ते तिसरे थोरले आहेत.


त्यांच्या बालपण काळात वडनगर रेल्वे स्थानकात चहा विक्री करण्यात मोदींनी वडिलांना मदत केली.

  नंतर एका  बस टर्मिनसजवळ भाड्याने चहाची स्टॉल चालविली.

त्यामुळेच त्यांना अनेकदा 'चायवला' असं म्हणताना तुम्ही ऐकलच असेल!

तसा तर वयाच्या 8 व्या वर्षीच मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सहभाग घेतला होता मात्र 1970 - 71 मध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे RSS मध्ये झोकून दिलं!

1967 मध्ये मोदींनी आपलं उच्च माध्यमिक शिक्षण वडनगर च्या एका शाळेत  पूर्ण केलं!

लग्न न करण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांनी 17 व्या वर्षीच घर सोडलं आणि पुढील 2 वर्ष  संपूर्ण भारतभ्रमण केलं!

काही interviews मध्ये त्यांनी या 2 वर्षांत स्वामी विवेकानंद यांच्या अनेक आश्रमांना भेट दिल्याचं सांगितलं आहे!


1970  मध्ये ते वयाच्या 20 व्या वर्षी आरएसएस मुळे इतके प्रभावित झाले की ते तेव्हा संघाचे  पूर्णवेळ प्रचारक बनले आणि त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 1971 मध्ये औपचारिकरित्या आरएसएसमध्ये प्रवेश घेतला.

 1970  च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या क्षेत्रात 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' नामक संघाच्या विद्यार्थी संघटनेच्या एक गटाची स्थापना केली.

त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघटनेशी असलेल्या संगतीचा महत्त्वपूर्ण फायदा झाला यात काही शंका नाही.


 दिल्ली विद्यापीठातील स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून त्यांनी राजकीय शास्त्राची पदवी पूर्ण केली आहे आणि नंतर त्यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य झाल्यावर त्यांनी निस्वार्थीपणा, सामाजिक जबाबदारी, समर्पण आणि राष्ट्रवादाची भावना हे गुण आत्मसात केले.

-1987 मध्ये त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आणि एकाच वर्षात त्यांना भाजप च्या गुजरात शाखेचा सरचिटणीस बनवण्यात आलं!


- 1988 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत  भाजपाचा पक्ष सत्तेवर आला.

- 1995 मध्ये त्यांनी पक्षासाठी प्रचार मोहीम करणारे महत्त्वपूर्ण रणनितीकार म्हणून आपली ओळख निर्माण केली!

- 1995 मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय युनिटचे सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली.

- मुख्य म्हणजे, 1998 मध्ये भाजपाची सत्ता आणण्यात दोन कार्यक्रमांचे महत्त्वपुर्ण योगदान होते.

 ते  म्हणजे सोमनाथ  ते अयोध्या रथयात्रा जी लालकृष्ण अडवाणी यांनी  केली होती आणि दुसरी रथयात्रा जी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात झाली होती.

- तेव्हा विविध राज्यांत पक्षाच्या संघटनेत नव्याने फेरबदल करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे श्रेय नरेंद्र मोदींना देण्यात आले.

-  1988 ते 2001 पर्यँत ते पक्षाच्या  सरचिटणीस पदी कार्यरत होते!

- ऑक्टोबर २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांचे पूर्ववर्ती केशुभाई पटेल यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता.

- 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

- त्यांनंतर ते सलग तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले.

- 24 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांनी राजकोट II मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकली.
 त्यांनी आयएनसीच्या (INC) अश्विन मेहताचा पराभव केला होता आणि ही त्यांची पहिली आणि अत्यंत अल्प मुदत होती.


- त्यानंतर त्यांनी मणिनगर येथून निवडणूक लढविली आणि आयएनसीच्या ओझा यतीनभाई नरेंद्रकुमार यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली आणि दुसर्‍या कार्यकाळात ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले.

- मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा तिसरा कार्यकाळ 23 December 2007 ते 20 डिसेंबर, 2012 पर्यंत होता.

यावेळी त्यांनी मणिनगरमधून जिंकून आयएनसीच्या दिनशा पटेल यांचा पराभव केला.

- त्यांनंतर ते पुन्हा मणिनगरमधून निवडून आले आणि त्यांनी यावेळी भट्ट श्वेता संजीवचा पराभव केला.

चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली मात्र यानंतर 2014 मध्ये त्यांनी विधानसभेमधून राजीनामा दिला.

- त्यानंतर, नरेंद्र मोदींनी प्रथमच 2014 ची लोकसभा निवडणूक लढविली.

त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली आणि 26 May 2014  रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

 ब्रिटीश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात जन्मलेले ते पहिले पंतप्रधान झाले.

लोकसभा निवडणूक 2019  मध्ये, समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांच्या विरोधात नरेंद्र मोदींनी 4.79. लाख मतांनी विजय मिळविला.


त्यांचा शपथविधी सोहळा 30 मे 2019 रोजी भारताच्या पंतप्रधानपदी सलग दुससऱ्यांदा आयोजित करण्यात आला.

विशेष म्हणजे पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे ते पहिलेच नेते आहेत!
#narendra#modi#bjp

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने