मला राजकारण करायचे नाही , मला काळजी आहे महाराष्ट्राच्या जनतेची : नारायण राणे || Marathi news


          भाजपा नेते आणि पूर्व मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार करोनावर नियंत्रण मिळवण्यातही अपयशी ठरल्याचा म्हंटल आहे . तसंच त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी मागणी ही आपली वैयक्तीक मागणी असल्याचं स्पष्ट केले .सरकारने ठोस पाऊले उचलावीत असही ते म्हणाले .


          राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाहता, तसंच मृतांची संख्या पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे असं वाटत असल्याचं राणे म्हणाले. रुग्णालयात द्यायला सरकारकडे बेड नाही, मृतांचं पार्थिव ठेवायला यांच्याकडे जागा असं असेल तर सरकार हवं तरी कशाला ? असा सवालही त्यांनी केला. तुम्ही पाच वर्ष सत्येत मंत्री राहा पण लोकांना वाचवा, मला राजकारण करायचे नाही , मला काळजी आहे महाराष्ट्राच्या जनतेची असंही ते म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मला राजकारण करायचे नाही , मला काळजी आहे महाराष्ट्राच्या जनतेची : नारायण राणे || Marathi news
मला राजकारण करायचे नाही , मला काळजी आहे महाराष्ट्राच्या जनतेची : नारायण राणे || Marathi news

          लॉकडाउन वाढवावा की नाही राज्यातील परिस्थिती पाहून ठरवावं. परंतु लोकं मात्र आता त्रस्त झाली आहेत. लोकांची सहनशीलता संपली आहे. एका बाजूला काही लोकं लॉकडाउन पाळत आहेत. तर औरंगाबाद असेल किंवा आणखी काही जिल्हे असतील त्यात लॉकडाउन दिसतच नाहीये रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे . मुंबईत काही भागात लॉकडाउनच दिसत नाही. आज पोलिसांच कोणी ऐकत नाही. आज लोकांना संरक्षण देणारेच सुरक्षित नाहीत, असंही राणे म्हणाले.


          “आज लोकांना रुग्णालयात जागा मिळत नाही. चार तास एक रुग्ण रुग्णालयात बसून होता. त्याला दाखल करून घेतलं नाही. अखेर त्याचा तिकडेच मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आम्ही काही बोलायचं नाही? जर मृतांची संख्या थांबली तर आम्ही या सरकारला चांगलं सरकारही म्हणू. परंतु मृतांची संख्या वाढतेय हे उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांपैकी मी नाही. ज्यांना गोडवे गायचे त्यांनी गावे. माझं वैयक्तिक म्हणणं राज्यापालांना सांगणं हे माझं कर्तव्य समजलो म्हणून मी गेलो. मी माझ्या मागणीवर आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहिन,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या अशा महाभयानक लढ्यात महाराष्ट्रात राजकारण नवे रूप घेताना दिसत आहे. 


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )


२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ


        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने