शून्य विचार अवस्था ( Zero state of mind ) : हवं तें मिळवण्याची जादु || Psychology


          खरं तर विचारच आपल्याला एक मानव बनवत असतात. प्रत्येक माणसाची एक विचारधारा असते आणि त्यानुसार तो घडत जातो. त्याला येणारे अनुभव, त्याचं व्यक्तिमत्व हे सर्व विचारांनी च तर घडत असतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच तर आपण निर्णय घेतो. पण जर कधी हे विचारच थांबले तर ? या लेखात आपण शून्य विचार अवस्था ( Zero state of mind ) : हवं तें मिळवण्याची जादु या बद्दल जाणून घेणार आहोत..



🔅 शून्य विचार अवस्था ( Zero state of mind ) 🔅


         आपलं शरीर हे एक ऊर्जा स्रोत आहे. आपली ऊर्जा आपण अनेक ठिकाणी कळत नकळत व्यर्थ करत असतो. सध्याचं Latest उदाहरण घेतलं तर Mobile च बघा, आपण आपल्या ऊर्जेचा कितीतरी मोठा भाग या Mobile मध्येच घालवतो, आणि ते होण्याचं कारण म्हणजे Mobile आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक  होऊन बसला आहे. असंच आपण अनेक गोष्टींवर आपली ऊर्जा खर्च करत राहतो आणि एक वेळ अशी येते की ती ऊर्जा सम्पून  आपण भरकटायला लागतो, आयुष्यात काय चाललंय याचं ही भान राहत नाही. मग सुरू होते चिडचिड, अति विचार करणं, संवेदनशील होणं आणि बरच काही..


          अशावेळी गरज भासू लागते ती शांततेची, अस वाटतं की हे विचार एकदा चे थांबून जावेत आणि मग आपण तसे प्रयत्न करायला लागतो. पण होतं काय की आपण त्यातून निघण्यासाठी पळवाटा शोधायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा व्यसनाधीनता वाढीस लागते, मग ते कशाचंही असो.. आणि Problem संपायच्या ऐवजी वाढायला लागतात. सर्व प्रयत्न करून झाले की मग शेवटी माणूस थकतो आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला गरज असते ती  मानसिक आणि शारीरिक शांततेची..


          मानसिक शांतता जर आपल्याला कुठून मिळत असेल तर ती ध्यानाद्वारे मिळू शकते. पण ध्यान करताना खूप विचार येतात.
शून्य विचार अवस्था ( Zero state of mind ) : हवं तें मिळवण्याची जादु || Psychology
शून्य विचार अवस्था ( Zero state of mind ) : हवं तें मिळवण्याची जादु || Psychology

           जेवढे जास्त तुम्ही प्रयत्न कराल तेवढे जास्त विचार येत राहतात आणि आपल्याला नाही जमायचं हे! म्हणून आपण बऱ्याचदा सोडून देतो. पण जर तुम्हाला सांगितलं की जे काय विचार येतात ते थांबवण्याची सुद्धा एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे तुम्ही तुम्हाला वाट्टेल ते मिळवू शकता. त्याबद्दल पुढे जाणून घेऊच.. पण त्या आधी Law of Attraction बद्दल थोडं जाणून घेऊ .



          तुम्ही याबद्दल कधीतरी वाचलं / ऐकलं असेलच, त्यात सांगण्यात येते की तुम्ही काहीही Attract करू शकता...पण मग प्रश्न पडतो की जर काहीही Attract करून मिळवता येतं तर मग ते खरंच Work का करत नाही? म्हणजे बघा, त्यांच्या Theory नुसार तुम्ही फक्त विचार करून हवं ते मिळवू शकता. तर आपल्याला प्रश्न पडणं साहजिकच आहे की हवं ते मिळवणं जर इतकं सोप्प आहे तर ते खरंच का मिळत नाही आणि याचा ध्यानाशी काय संबंध? किंवा वर हे जे विचारशून्यता लिहिलंय याचं आणि त्याचं काय Connection?


          याचं उत्तर आहे 0 Thought Mind State.. जेव्हा तुम्ही तुमच्या सूक्ष्म शरीराशी Connect होता तेव्हा तुम्ही या State मध्ये जाऊन तुम्हाला वाटेल तसा Change आपल्या आयुष्यात आणि शकता. थोडक्यात काय, जेव्हा तुम्ही तुमची सर्व ऊर्जा एका ठिकाणी आणता तेव्हा त्यातून मिळणारे Results हे अप्रतिमच असतात. याबद्दल थोडं जाणून घेऊ..


          0 Thought State अशी अवस्था असते जेथे तुम्ही तुमचे विचार शून्य करून एका अशा अवस्थेत राहू शकता,जेथे फक्त तुमचं अस्तित्व राहतं. वातावरण, वास्तविकता, आणि अतिचिंता सारख्या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. थोडक्यात काय तुम्ही सूक्ष्म शरीरात प्रवेश करता, परिणामी तुम्ही शांत अति शांत होत जाऊन तुमचं शरीर ऊर्जेने भरून जातं. Law of Attraction सुद्धा तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही त्या अवस्थेत जाता. आता खरंच हे Possible आहे का? हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःला ते करून बघावं लागेल आणि जर तो अनुभव घ्यायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल याबाबत जाणून घेऊ..


याच्या काही steps -

1. सुरुवात ध्यानापासून करा.

2. हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुमचा Mind कुठेतरी Focus होऊन शांत होण्यास सुरुवात होईल.

3. शरीरावर लक्ष केंद्रित करा आणि कल्पना करा की तुमचं शरीर Relax होत आहे.

4. आता Random Thoughts येऊ शकतात, तर तुम्ही प्रत्येक वेळी श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे.

5. एकदा तुमची Practice झाली की हळूहळू तुमचे विचार कमी व्हायला लागतील.

6. मनाला Divert करायचं असेल तेव्हा जे काय विचार यायला लागतील त्यांना सजग राहून Count करा म्हणजे जर एखादा विचार आला तर त्या विचारासोबत वाहत न जाता तो फक्त एक विचार आहे असं समजून त्या विचारला Count करा. असंच प्रत्येक विचारासोबत करा.

7. 21 दिवस तरी हे प्रयोग करा. जेणेकरून तुम्हाला सवय होईल आणि हळूहळू Result मिळणं सुरू होईल.


          शून्य विचार अवस्थेत विचार बंद होणार नाहीत पण ज्यामुळे तुमची ऊर्जा व्यर्थ होतेय ते सर्व विचार बंद होतील. आणि एकदा का ती अवस्था सुरू झाली की तुम्हाला जे काय अनुभव येतील ते फक्त तुमच्याच फायद्याचे असतील, म्हणून आयुष्य सूंदर बदलायचं असेल तर एकदा तरी हा अनुभव घेऊन बघावाच !




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने