Dr. Salim Ali (डॉ.सालिम अली) : Veena Gavankar

Dr. Salim Ali (डॉ.सालिम अली) : Veena Gavankar
Dr. Salim Ali (डॉ.सालिम अली) : Veena Gavankar



काही दिवसांपूर्वी Veena Gavankar मॅम लिखित डॉ.सालिम अली हे छोटंस पण माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट पुस्तक दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.
पर्यावरणाच्या बाबतीत सिद्धार्थ गौतम बुद्ध,हेन्री डेव्हीड थोरो,जॉन म्यूर नंतर सालिम अली सरांना मी माझा चौथा गुरू मानतो तर चकवा चांदण वाचल्यापासून मारुती चितमपल्ली हे माझे पाचवे गुरू आहेत.सुरुवातीला गौतम बुद्ध वाचून मला पर्यावरण, निसर्ग,जंगल,वृक्ष,पशु,पक्षींच्या सानिध्यात राहायची आवड लागली.या सर्वाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली.पुढे लॉकडाऊन मध्ये थोरो गुरुजी लिखित वॉल्डन प्रथमच वाचलं तेव्हा ही आवड कितीतरी पटीने वाढली आहे.मग यानंतर मी निसर्गप्रेमी जॉन म्युर आणि या पाठोपाठ डॉ.सालिम अली हे पुस्तक प्रथमच वाचून पूर्ण केलं.वेगवेगळ्या कालखंडातील या पाचही निसर्गप्रेमी,पर्यावरणवादी माणसांनी आणि यांच्या विचारांनी मला निर्सगाकडे ओढलं.निसर्गावर प्रेम करायला भाग पाडून मला निसर्गाशी,प्राण्यांशी मैत्री करायला लावली.यांच्याबद्दल जास्त विशेष न वाचता सुद्धा काही निवडक मराठी पुस्तके, लेख आणि युट्यूब व्हिडिओस बघून मी भारावून गेलो.यांचा प्रचंड चाहता झालो.यांच्यापासून कळत/नकळतपणे खूप काही शिकलो.मनोमन मी यांना पर्यावरणाच्या बाबतीत माझ्या गुरूचा दर्जा दिला आहे..
डॉ.सालिम अली या पुस्तकाबद्दल मला वॉल्डन,निसर्गमित्र जॉन म्युर नंतरच लिहायचं होतं.पण काही कारणाने तेव्हा ते जमलं नाही.म्हणून काही दिवसांपूर्वी मित्राला हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं आणि मी सुद्धा दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.पूर्वीपेक्षा नवीन आयाम समजले किंवा पूर्वी वाचलेलं जे काही विसरलो होतो ते पुन्हा नव्याने मेंदूत फिट झालं..हे पुस्तक जरी छोटंस 88 पृष्ठसंख्या असलेलं असेल. पण तरीही पक्षीतज्ञ सालिम गुरुजींच्या आयुष्याचा आढावा खूप छान आणि सोप्या भाषेत या पुस्तकात घेण्यात आला आहे.जो वाचत असताना वाचकांना खिळवून ठेवतो.खूपच सुंदररित्या गुरुजींची जीवनगाथा या पुस्तकात मांडण्यात आलेली आहे.हे पुस्तक गुरुजींच्या बाबतीत अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचकांना प्रवृत्त करते.जगण्यालायक राखण्यासाठी लोकजागृती झाली पाहिजे या गोष्टीचं भान ठेवून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणारे सालिम गुरुजी यांचे विचार खूप महान होते.आणि या पुस्तकातून पावलोपावली त्यांच्या विचारांच्या उंचीची प्रचिती आपल्याला येते.
Veena Gavankar या लेखिका माझ्या टॉप आवडत्या लेखकाच्या यादीत अग्रणी असण्याचं कारण त्यांचा सोपा,साधा आणि उत्कृष्ट माहितीपर लिखाण तर आहेच. यासोबतच कोणतेही पुस्तक लिहण्यासाठी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत,केलेला अभ्यास आणि केलेली रिसर्च हे मुळ कारण आहे.याची प्रचिती त्यांनी पुस्तकाशेवटी दिलेल्या संदर्भावरूनच वाचकाला येते.तर सर्वांत मुख्य मुद्दा त्यांनी पुस्तक लिखानासाठी निवडलेला विषय अथवा व्यक्तीमत्त्व हा पूर्णपणे युनिक आणि भन्नाट असतो..
मग ते पुस्तक,
■एक होता कार्व्हर
■सर्पतज्ञ डॉ.रेमेंड डिटमार्स
■रोझलिंड फ्रॅंकलिन
■डॉ.खानखोजे
■डॉ.आयडा स्कडर
■गोल्डा
■डॉ.सालिम अली असो अथवा नुकतंच प्रकाशित झालेलं
■ रिचर्ड बेकर अवघा देहचि वृक्ष जाहला.
हे एक आगळंवेगळं पुस्तक असो.मॅमनी लिहलेलं प्रत्येक पुस्तक भारी आणि जगावेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती देणारा असतो..पर्यावरण, निसर्ग आणि देशासाठी आपला आयुष्य खर्ची घालणाऱ्या अफाट माणसांची ओळख मॅमनी आपल्या वेगवेगळ्या पुस्तकातून वेळोवेळी करून दिली आहे.आणि असंख्य वाचकांना या व्यक्तिमत्त्व व विषयांच्या प्रेमात पाडलं आहे.त्याबद्दल एका वाचकाच्या आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या युवकाच्या वतीने मॅम Thank u so much ♥️मुळात ही फक्त फॉर्मलिटी असली जरी असली तरीही हे शब्द मनातले आहेत.आपली पुस्तके वाचून खूप खूप नवीन शिकायला आणि जगायला मिळालं आहे.
तर आता मुळ पुस्तकाडे वळूया..

डॉ.सालिम गुरुजी हे कमालीचे भारतीय पक्षितज्ञ,निसर्गमित्र आणि पर्यावरणवादी होते.भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध, तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ यासाठी सालिम गुरुजी प्रसिद्ध आहेत.त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. त्यांना "भारतीय पक्षी" म्हणून सुद्धा संबोधले जाते..पद्मभूषण,पद्मविभूषण आणि इतर असंख्य मानसन्मान त्यांना मिळाले असून या भारतीय कोहिनूराबद्दल या पुस्तकात आपल्याला रंजक माहिती वाचायला मिळते.त्यांच्या सहवासात वावरलेल्या व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून गुरुजींबद्दल माहिती घेऊन,त्यांच्या आठवणी ऐकून घेतल्या. यासोबतच गुरुजींसोबत वेगवेगळ्या व्यक्तींचे झालेले पत्रव्यवहार,उपलब्ध असलेल्या

काही चित्रफिती, रोजनिशी, व्याख्यानाचे कच्चे आराखडे इत्यादी सर्वांचा अभ्यास करून,गुरुजींच्या सानिध्यात राहिलेल्या महत्वपूर्ण व्यक्तींची मुलाखत घेऊन..
लेखिका वीणा मॅमनी हे पुस्तक लिहलं आहे.
जे खऱ्या अर्थाने अफलातून असं एक पुस्तक आहे.
गुरुजीं आणि त्यांच्या विचारांबद्दल लेखिका आपल्या मनोगतात म्हणतात,
आपली पृथ्वी आणि यातील पर्यावरण सजीवांना पक्ष्यांवर प्रेम करताना , भारत हा शेतीप्रधान देश आहे याचा विसरही त्यांना कधी पडला नाही . जंगले आणि शेती यांच्यासंबंधात पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना , मानवी जीवनात पक्ष्यांचे अर्थशास्त्रीय दृष्ट्या स्थान ठरवताना सजीव साखळीतील एक घटक म्हणूनच पक्ष्यांचा त्यांनी विचार केलाय.शेतकऱ्याचे , शेतीचे खरे शत्रू आहेत कीटक . पक्षी नव्हेत . कीटकांच्या तीस हजार जाती आहेत . वनस्पतीचा प्रत्येक अवयव त्यांचे भक्ष्य आहे. पक्षी कीटकांचे भक्षक आहेत .बाल्यावस्थेत तर पक्षी केवळ महासंहारक मृदुकाय कीटकांवरच जगत असतात . तेव्हा जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी जगलेच पाहिजेत असं त्याचं स्पष्ट सांगणं होतं . पशुपक्ष्यांकडे बघण्याचा पक्ष्यांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन हा भाबड्या भूतदयेचा नव्हता . निसर्गातील सजीव साखळीतील महत्त्वाचे नि अटळ घटक म्हणून होता..
तर..
आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणाऱ्या दुर्मिळ ज्ञानपिपासू मानवजातीला अखेरचा हा नमुना....
अस्तंगत पावत चाललीय ही जात..
आणि यासोबतच
मनोगताच्या शेवटी मॅम म्हणतात..
सालिम गुरुजींची जिद्द , तळमळ , कार्यावरची निष्ठा , दूरदर्शित्व जाणवल्यावर मन थक्क झालं.वाटलं , सालिम अलींपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करणाऱ्यांची संख्या वाढली तरच खऱ्या अर्थी सालिम अलींचे विचार या भूमीत रुजले , अंकुरले , फुलले , फळले असे म्हणता येईल . तसं झालं नाही तर मात्र ' सालिम अलींचे विचार ' परदेशातून आयात करून नव्यानं समजावून घ्यावे लागतील अन् तोवर फार फार उशीर झालेला असेल ... गेली दोन अडीच वर्षं सालिम अलींभोवती वावरत असताना त्यांच्या कार्याचा , विचारांचा नि व्यक्तित्वाचा जो ठसा मनात उमटला त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केलाय..🙏आणि हा प्रामाणिक प्रयत्न सार्थक झाला आहे असे मी एका वाचकाच्या नात्याने म्हणू शकतो..या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली 1990 साली.माझ्या जन्माच्या 8 वर्षाआधी आणि मी हे पुस्तक वाचलं 2020/22 साली तब्बल 30/32 वर्षानंतर.पण या पुस्तकाने मला खूप काही शिकवलं.सालिम गुरूजी यांना माझ्या आयुष्यात या पुस्तकाने आणलं.चारुहास पंडित यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ तर कमालीचं अफलातून आहे.जो वाचकांना बघता क्षणीच आपल्या प्रेमात पाडायचं काम करतो.
पक्षीनिरीक्षण,निसर्ग प्रेम,स्वयंशिस्त,हजरजबाबीपणा,निस्वार्थीपणा आणि इत्यादी असंख्य गोष्टी गुरुजींपासून शिकायला मिळाल्या..♥️©Moin Humanist✍️

Post a Comment

أحدث أقدم