श्री क्षेत्र संगम माहुली Sangam mahuli places to visit

Sangam mahuli places to visit
Sangam mahuli places to visit

Sangam mahuli places to visit


  सातारा जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध  तीर्थक्षेत्र. हे सातारा शहरापासून ५ कि मी अंतरावर वर कृष्णा आणि वैण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. संगमाच्या पूर्वेकडील गावास क्षेत्र माहुली आणि पश्चिमेकडील गावास संगम माहुली असे म्हणतात.   
छत्रपती राजाराम महाराजांनी क्षेत्र माहुली प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिला होता. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात  संगम माहुली चे खूप महत्त्व वाढले होते. छ. शांहूनी इ स १७२० साली ग्रहणादिवसी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे (Sangam mahuli) दान दिले होते.


 पंतप्रतिनिधी आणि इतर कांही सरदार व  राजघराण्यातील स्त्रियांनी येथे दहा बारा मंदिरे अठराव्या शतकात बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर, कृष्णेश्वर महादेव, कृष्णामाई इत्यादी मंदिर प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर सर्वांत मोठे आणि सुंदर आहे. ही मंदिरे मराठा वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहेत
 ‌.  बहुतेक मंदिरे नदीकाठावर असून येथील दोन दीपमाळा खूपच सुंदर आणि  वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत. छ. शाहू महाराज,  पेशवे, पंतप्रतिनिधी, पंतसचिव हे स्नानासाठी प्रसंगानुरूप येथे येत असत..  पेशवाईतील इतिहास प्रसिद्ध न्यायाधीश  रामशास्त्री प्रभुणे यांची  संगम माहुली ही जन्मभूमी. रामशास्त्रीनी निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य  येथेच वास्तव्य केले. 
संगम माहुली जिल्हा सातारा येथे मराठा इतिहासाच्या पाऊलखुणा खुणा आहेत. संगम माहुली साता-या पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. येथे कृष्णा आणि वेण्णा नद्याचा संगम आहे. येथे गावाचे दोन भाग असून अलीकडे  संगम माहुली आणि पैलतीरावर क्षेत्र माहुली आहे .
माझी आजची संगम माहुली भेट ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी  येसुबाई यांच्या समाधी मंदिर दर्शनासाठी होती . अलिकडेच या समाधी मंदिराचा शोध लागला आहे. 
समाधी मंदिराचे गर्भगृह रिकामे असून आत पादूका किंवा शिवलिंग नाही. समाधी मंदिराचे बांधकाम हे मराठा बांधकाम शैलीचे असून खूपच सुरेख आहे ‌. समाधी चौथर्यावर शरभ , हत्ती , चक्र आणि क्षात्र खुणा असलेले अनेक  शिल्प आहेत. हे समाधी मंदिर अतिक्रमणाचे विळख्यात सापडलेले  ‌असून  महाराणी चे समाधी मंदिर मोकळा श्वास घेण्याच्या प्रतिक्षेत आहे.
छत्रपती शाहू महाराजांची समाधी नदीच्या पात्रात असून अलीकडेच संवर्धन झालेले दिसते आहे ‌
महाराणी ताराबाई यांची समाधी संगम माहुली येथे नदी पात्रात होती. सध्या महाराणी ताराबाई समाधी चे आवषेश संगम माहुली गावातील एका समाधीवर आणून ठेवले आहेत. 
संगम माहुली गावात व नदी पात्रात इतर अनेक समाध्या असून त्या नक्की कोणाच्या आहेत हे कोणालाही माहीत नाही. संगम माहुली गावाच्या रस्त्यावर छत्रपति थोरले शाहू महाराजांच्या इमानी श्वावानाची समाधी असून उत्तम स्थितीत आहे.

टीप - 
वर्तमान अवस्थेत येथे नदी किनारी घानीचे साम्राज्य पसरले  असून या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 लग्नापूर्वी होणार्या प्री वेंडीग फोटो शुट करणार्यांनी  विश्वेश्वर मंदिरत तर अक्षरशा हैदोस घातला आहे. मुक्त पणे मंदिरास प्रदक्षिणा सुध्दा घालता येत नाही.
  यावर नियंत्रण असायला हवे.


Post a Comment

أحدث أقدم