लेखिका जे.के रोलिंग बद्दल थोडक्यात माहिती । information about J.K. Rowling
जे.के रोलिंग /J.K. Rowling |
जे.के रोलिंग /J.K. Rowling
आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखक/लेखिकांनी विविध विषयांवर लिहलेली पुस्तके किंवा कादंबऱ्या वाचत असतो.त्यातून खूप काही शिकत असतो.त्या वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा,गप्पा मारत असतो.
पण आपण कधी ते पुस्तक अथवा कादंबरी लिहणाऱ्या लेखक/लेखिकेच्या बद्दल विशेष काही वाचत नाही किंवा माहिती करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही.आपण कधी हा प्रश्न आपल्या मनाला विचारत नाही की खरंच एखादं पुस्तक लिहणाऱ्या लेखकाचं जीवन प्रवास सुद्धा खूप रोचक आणि प्रेरणादायी असू शकतो.पुस्तक लिहण्याच्या प्रवासात त्याला कोणकोणत्या आव्हान,समस्या आणि प्रश्नांना तोंड द्यावा लागला असेल ?इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे सुद्धा फार रोचक आणि प्रेरणादायी असू शकते.म्हणूनच आपण एखादं पुस्तक वाचायला घेतल्यावर त्या पुस्तकाच्या लेखकांबद्दल सुद्धा विशेष माहिती करून घ्यायचं प्रयत्न करायला हवं आणि पुस्तकांसोबतच त्या त्या लेखकाचा जीवन प्रवास जाणून घेऊन त्यातून सुद्धा शक्य होईल तेवढं शिकून घ्यायला हवं.
सांगायचा मुद्दा असा मी हे सर्वकाही करत असतो.त्यामुळे इतरांना कल्पना देण्यासाठी आज मी अशाच एका लेखिकेबद्दल येथे लिहीत आहे.ह्या लेखिकेची पुस्तके आज जागतिक पातळीवर गाजलेली आहे.या लेखिकेच्या एकूण 7 पुस्तकांच्या शृंखलेवर/भागांवर एकूण 8 बहुचर्चित चित्रपट निघालेले आहेत.या कादंबरीच्या मालिकेने आता पर्यंत असंख्य पुरस्कार जिंकले आहेत आणि या पुस्तकाच्या ५०० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. ही इतिहासातील सर्वाधिक विक्री होणारी पुस्तक मालिका ठरली होती. ह्याच चित्रपटांच्या मालिकेमुळे या पुस्तकांची लेखिका हि जगातील पहिली अब्जाधीश लेखिका ठरली.
होय मी बोलतोय हॅरी पॉटर या अफलातून गाजलेल्या कादंबरीबद्दल आणि ही जागतिक दर्जाची कादंबरी लिहणाऱ्या जे.के रोलिंग /J.K. Rowling या लेखिकेबद्दल.हॅरी पॉटरचं 7 मराठी अनुवाद वाचून आणि त्यावरील चित्रपट बघून मला जे के रोलिंग बद्दल माहिती करून घ्यायला आवडली.आणि मी विशेष याबद्दल माहिती घेतली.
ही इंग्रजी कादंबरी जरी आज जागतिक पातळीवर गाजलेली असेल,जगभरातील करोडो वाचक या कादंबरीचे चाहते असतील आणि ही कादंबरी व लेखिका आज सफलतेच्या खूप उंचीवर असेल.पण इथपर्यंतचा हा प्रवास काही सोपा नव्हता.हॅरी पॉटरला इथपर्यंत आणण्यासाठी लेखिकेला खूप संघर्ष करावा लागला.खूप मेहनत घ्यावी लागली.लेखिकेचा जीवन प्रवास खूपच संघर्षानी भरलेला असून जो खुपच प्रेरणादायी आणि खूप काही शिकवून जाणारा आहे.अफाट इच्छाशक्ती आणि हार न मानण्याची प्रेरणा आपण जे के रोलिंग कडून घ्यायला हवी..आपल्या स्वप्नाला अर्ध्यातच सोडून न देता आपली आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातच आपण जर योग्य मार्गक्रमण केलं तर यश हा नक्कीच मिळतो हे जे के रोलिंगच्या आयुष्याकडे बघून आपल्याला समजते.
जे.के रोलिंग /J.K. Rowling जन्म 31 जुलै 1965 रोजी इंग्लंड येथे झाला.
बालपणापासून रोलिंगला वेगवेगळ्या गोष्टी लिहण्याचा छंद होता.तिचा बालपण आईच्या सतत आजारपणामुळे व पालकांच्या घरेलु भांडणामुळे चांगला गेला नाही.याचा परिणाम तिच्या शिक्षणावर सुद्धा झाला असल्याने ती एक सामान्य विद्यार्थी बनुनच राहिली.1986 मध्ये एक्सेटर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, रोलिंगने लंडनमधील अॅम्नेस्टी इंटरनॅशनलसाठी काम करण्यास सुरुवात केली, येथे तिने हॅरी पॉटर कथा लिहिण्यास सुरुवात केली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस तिने परदेशी भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यासाठी पोर्तुगालला प्रवास केला, परंतु, लग्नानंतर आणि तिच्या मुलीच्या जन्मानंतर, ती एडिनबर्गमध्ये स्थायिक होऊन युनायटेड किंगडमला परतली.फ्रेंच शिक्षिका म्हणून सार्वजनिक सहाय्यावर राहून तिने लेखन सुरू ठेवले.तिने तिची पहिली कादंबरी कॉफी हाउसमध्ये बसून रद्दीतल्या पाठकोऱ्या कागदांवर लिहिली.तिचे पहिले पुस्तक पूर्ण करण्यास तिला तब्बल पाच वर्षे लागली. तिची ही पहिली कादंबरी मोठ्या अडचणीने प्रकाशित झाली आणि बघता बघता यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचली.आणि यामुळेच हॅरी पॉटर सारखा हा पात्र विश्वभरातील वाचकांना मिळाला यासोबतच अफलातून अशी जादुई दुनिया अनुभवायला मिळाली..
खालील जे के रोलिंगच्या आयुष्याचा मुख्य घटनाक्रम बघूनच आपल्याला तिच्या आयुष्यातील संघर्षाची प्रचिती येते.




आणि येथून ती नैराश्यात गेली.



पण सुरुवातीला १२ प्रकाशकांनी तिचे पुस्तक नाकारल्यामुळे ती अजून खचत गेली. पण शेवटी लंडनमधील ब्लूमस्बेरी या प्रकाशनगृहाने तिच्या पुस्तकाला ग्रीन सिग्नल दिले. ब्लूमबरीने जे.के. रोलिंग कडून हॅरी पॉटरचे हक्क ४००० डॉलर्सवर आणले. या पुस्तकाच्या विक्रीच्या सुरुवातीच्या काळातच कमालीची लोकप्रियता मिळवली.

जे के रोलिंग ची पहिलीवहिली कादंबरी "हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन" आंतरराष्ट्रीय कीर्तीला जाऊन पोहोचली . समीक्षकांनी या कादंबरीवर भरभरून स्तुतिसुमनं उधळली. आणि या कादंबरीला अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कारांमध्ये ' ब्रिटिश बुक ॲवॉर्ड्स ' , ' चिल्ड्रन्स बुक ऑफ द इअर ' आणि ' स्मार्टीज अॅवॉर्ड ' यांचा समावेश आहे..या पुढील भागांना सुद्धा ब्रिटिश बुक अवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले.
येथून जे के रोलिंगने मागे वळून बघितलं नाही.तिचा संघर्षापासून सफलते पर्यतचा प्रवास हा असंख्याना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा आहे.जिद्द,इच्छाशक्ती आणि आपल्या कामाप्रति असलेली पॅशन असणारा व्यक्ती कधीही अयशस्वी होत नाही एवढं नक्की..

©Moin Humanist

إرسال تعليق