अहमदनगरमध्ये नऊ हजारांहून अधिक अल्पवयीन मुलांना करोनाची लागण
कोरोना लाट ओसरताना दिसत असताना आता लहान मुलांमधील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे .फेब्रुवारी पासून दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून आला होता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचे मृत्यू झाले .अनेक लोकांचे ऑक्सिजन अभावी जीव गेले .अश्यात लहान मुलांमधील कोरोनचे प्रमाण वाढत आहे मे महिन्यात अहमदनगर मध्ये ९००० पेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे .तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना धोका असला तरी एकूण रुग्णांपैकी ४ ते ५ टक्के बालकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु हे प्रमाण टक्क्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आकड्यांमध्ये संख्या अधिक असू शकते, असे डॉ.सुहास प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.हि आकडेवारी चिंताजनक असून तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असून पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे .
إرسال تعليق