मिस वर्ल्ड 2019 : जमैकाच्या टोनी एन सिंग विजेतेपद जिंकले, तिसऱ्या स्थानी भारताच्या सुमन राव । News ।। खासमराठी.

लंडन :  लंडन मध्ये आयोजित मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंट 2019 चा किताब जमैकाच्या टोनी एन सिंह जिंकण्यात सफल राहिल्या . फ्रांस च्या ओफेली मेझिनो आणि  भारताच्या सुमन राव या स्पर्धेत फर्स्ट और सेकेंड रनरअप राहिल्या आहेत . टोनी एन. सिंग यांना मेक्सिकोच्या मिस वर्ल्ड 2018 व्हेनेसा पॉन्सेने मंचावर ताज घालून अभिनंदन केले .

          टोनी एन सिंग यांना गाणे, ब्लॉगिंग आवडते आणि भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. त्यांनी कॅरेबियन स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी काम केले आहे तर राजस्थानच्या सुमन राव 20 वर्षांच्या असून त्यांनी जूनमध्ये मिस इंडिया 2019 चा किताब जिंकला होता . त्यांना सिनेअभिनेत्री व्हायचं आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून त्या मॉडेलिंगच्या असाईनमेंट्स आणि अभ्यासात व्यस्त होत्या .

मिस वर्ल्ड 2019 : जमैकाच्या टोनी एन सिंग विजेतेपद जिंकले, तिसऱ्या स्थानी भारताच्या सुमन राव । News ।। खासमराठी.
मिस वर्ल्ड 2019 : जमैकाच्या टोनी एन सिंग विजेतेपद जिंकले, तिसऱ्या स्थानी भारताच्या सुमन राव । News ।। खासमराठी.

          आयएएनएसशी बोलताना त्यांनी सांगितले की त्या आपल्या समाजातील लैंगिक समानतेबद्दल बोलू इच्छित आहे. यासह त्यांना जागतिक स्तरावरही हा मुद्दा उपस्थित करायचा आहे. या स्पर्धेच्या अंतिम प्रश्नोत्तराच्या फेरीत पाच स्पर्धक उरले होते . या कार्यक्रमात ब्रिटिश प्रसारक पायर्स मॉर्गन मुख्य जज म्हणून हजर झाले आणि त्यांनी अंतिम स्पर्धकांना प्रश्न विचारले .

          मिस वर्ल्ड 2019 ही या स्पर्धेची 69 वी एडिशन आहे आणि 120 देशांमधील महिलांनी या स्पर्धेसाठी भाग घेतला. मिस वर्ल्ड 2019 चा उद्घाटन सोहळा लंडनमध्ये 20 नोव्हेंबरला झाला. कॅनडाची निओमी कोलफोर्ड, जपानची मलिका सेरा, इंग्लंडची भाषा भाषा मुखर्जी, न्यूझीलंडची ल्युसी ब्रॉक आणि अमेरिकेची अ‍ॅमी कुवेलियर या स्पर्धक महिलांनी भाग घेतला .

कोण आहेत सुमन राव :

मिस वर्ल्ड 2019 : जमैकाच्या टोनी एन सिंग विजेतेपद जिंकले, तिसऱ्या स्थानी भारताच्या सुमन राव । News ।। खासमराठी.
मिस वर्ल्ड 2019 : जमैकाच्या टोनी एन सिंग विजेतेपद जिंकले, तिसऱ्या स्थानी भारताच्या सुमन राव । News ।। खासमराठी. 

          लंडनमध्ये 14 डिसेंबरला मिस वर्ल्ड 2019 च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारऱ्या सुमन राव यांनी सौंदर्य स्पर्धेदरम्यान मिस वर्ल्ड एशिया 2019 चा किताब जिंकला. उदयपुर जवळील ऐडाना गावात जन्मलेल्या सुमन आपल्या कुटुंबासमवेत एक वर्षांची झाल्यावर मुंबईला गेल्या . सुमनचे वडील ज्वेलर आहेत तर आई गृहिणी आहे. त्यांना दोन भाऊ आहेत. शाळा संपल्यानंतर सुमन मुंबई विद्यापीठातून अकाउंटन्सीचा अभ्यासक्रम सुरू केला. त्या एक प्रशिक्षित कथ्थक नर्तकही आहेत. 2018 मध्ये सुमनने मिस नवी मुंबई स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांना प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर सुमनने मिस राजस्थान 2019 स्पर्धेसाठी ऑडिशन मिळवून विजेतेपद जिंकले.

पुढच्या प्रवासासाठी मिस वर्ल्ड एशिया सुमन राव यांना खासमराठी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्या... !!ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

Previous Post Next Post